🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या....!


🌟जन धन योजनेंतर्गत उघडलेली 10 कोटी खाती निष्क्रिय,बँकेतील 12000 कोटींहून अधिक रक्कम कोणाची🌟

* पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 30 डिसेंबरला पहिल्या अमृत भारत ट्रेनचे लोकार्पण होणार, मात्र इतर ट्रेनच्या तुलनेत प्रवास महाग असणार 

* उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रणशिंग फुंकलं, 6 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा, पहिल्या सभा यवतमाळ, वाशिमआणि रामटेक येथे होणार

* नवीन वर्षात 22 जानेवारीला अयोध्या धाममधील श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार; राम मंदिराच्या या तिथीमुळं येत्या महिन्यात देशात 50 हजार कोटींहून अधिकचा व्यवसाय होणार

* RBI बिल्डिंग बाँबने उडवून देणाऱ्या आरोपींना 3 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी, आरोपींचा दहशतवादी गटाशी संबंध आहे का याचा तपास सुरू

* जन धन योजनेंतर्गत उघडलेली 10 कोटी खाती निष्क्रिय, बँकेतील 12000 कोटींहून अधिक रक्कम कोणाची असा सवाल समोर

* नऱ्हे आंबेगाव येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीच्या उभारणीसाठी गुजरात सरकारचा हातभार; दिली पाच कोटी रुपयांची देणगी

* राज्य परिवहन महामंडळाच्या महिला सवलत योजनेमुळे एसटीचे उत्पन्न 915 कोटींवर; एसटी महामंडळाला दिलासा

* इलॉन मस्क गुजरातमध्ये भारतातील पहिला कारखाना उभारणार; लवकरच घोषणा होण्याची शक्यता

* कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या आठ माजी नौसेना अधिकाऱ्यांना मोठा दिलासा; भारत सरकारच्या याचिकेनंतर आठ जणांच्या मृत्यूच्या शिक्षेला दिली स्थगिती

* रायगड जिल्ह्यात खळबळ; 1500 किलो जिवंत जिलेटीन आणि 70 किलो डेटोनेटर हस्तगत ;  माणगाव पोलीसांची धडक कारवाई

* राज ठाकरे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा भेट, राजकारणात नव्या युतीची नांदी ?

*सर्वच गोष्टी  उघड करायच्या नसतात शरद पवारांच्या भेटीनंतर बच्चु कडु यांचे वक्तव्य

 *शरद पवारांनी थोर समाजसेवक पापळकरांंच्या आश्रमाला दिली भेट

* देशात जर गरिबी ही एकच जात असेल तर तुम्ही ओबीसी कसे?, राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल

* मनोज जरांगेंची  20 जानेवारी पासूनआंतरवाली ते मुंबई पायी दिंडी

* जतमध्ये रेशनच्या तांदळात आढळला चक्क प्लास्टिक तांदूळ

 ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या