🌟परभणीत सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचे आयोजन......!


🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली दि.07 डिसेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता आयोजन🌟 

परभणी (दि. ०४ डिसेंबर) : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2023 संकलन शुभारंभ कार्यक्रम जिल्हा ध्वजदिन समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 07 डिसेंबर, 2023 रोजी दुपारी 12:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे आयोजित करण्यात आला आहे. 

या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील शहीदांना मानवंदना, शहीदांच्या वीर पत्नी/वीर माता यांचा सन्मान, विविध कार्यालयांनी गत वर्ष उत्कृष्ट ध्वजदिन निधी संकलन केल्याबद्दल पारितोषिक व प्रशस्तीपत्र वाटप, माजी सैनिक यांच्या पाल्यांना कल्याणकारी निधी मधुन शिष्यवृत्ती योजनेतंर्गत धनादेश वाटप व ध्वजदिन निधी 2023 संकलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व वीर पत्नी, वीर माता/पिता तसेच माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी यांनी दि. 07 डिसेंबर, 2023 रोजी जिल्हा नियोजन सभगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी केले आहे.....

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या