🌟आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ पालम शहर कडकडीत बंद....!


🌟आ.पडळकर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ रॅली देखील संपन्न🌟 

परभणी/पालम (दि.१० डिसेंबर) : धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज रविवार दि.१० डिसेंबर रोजी पालम शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापार्‍यांनी सकाळपासून आपआपली प्रतिष्ठाने बंद ठेवून या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

            पालम शहरासह तालुक्यातून समाजबांधव सकाळी एकत्र जमण्यास सुरूवात झाली. यावेळी त्यांनी शहर पोलीस ठाण्यात आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर येथूनच निषेध रॅली काढण्यात आली. शनिवार बाजार, पेठपिंपळगाव चौकमार्गे ही रॅली तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. संबंधितांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

          यावेळी माजी सभापती गणेशराव घोरपडे, माजी उपनगराध्यक्ष असद खान पठाण, नगरसेवक ज्ञानराज घोरपडे, कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक माऊली घोरपडे, माजी नगरसेवक विजय घोरपडे, मंगेश घोरपडे, सरपंच भास्कर लांडे, अतुल धुळगुंडे, मंगेश दयाळ, सुदाम घोरपडे, अक्षय गडगिळे, साहेब वाघमारे, विनोद घोरपडे, होनाजी घोरपडे, चेतन बाळासाहेब लांडे, भागवत हाके, राजू वाघमारे, संदीप घोरपडे, सुभाष आव्हाड, गणेश शेंगोळे, भागवत लेवडे, बसवेश्वर लिंगायत, निलेश घोरपडे, रंजीत सिरस्कर, दत्ता रोकडे, विक्रांत घोरपडे, मुंजाजी घोरपडे, आकाश कऊटकर, दौलत शेंगुळे, तानाजी पैके, अविनाश घोरपडे आदी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या