🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे कापूस खरेदीचा शुभारंभ संपन्न....!


🌟ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी रुद्रवार यांच्या हस्ते कापूस खरेदीचा नारळ फोडून शुभारंभ🌟


पुर्णा : पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील जे.आर.काॅटन जिनींग येथे 14 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी रुद्रवार यांच्या हस्ते कापूस खरेदीचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला.यावेळी पहिल्या पाच आलेल्या शेतकर्यांचा बाजार समिती व जिनींग मालकाच्या वतीने सत्कार करण्यात आला आज आलेल्या कापसाला 7111 रूपये भाव मिळाला आहे.

यावेळी सभापती बालाजी रुद्रवार, उपसभापती अंकुशराव शिंदे, सरपंच गजानन आंबोरे संचालक रंगनाथ भोसले, पंडितराव जाधव, अंकुशराव जोगदंड, बाळासाहेब पवार, देवानंद नावकीकर, नरहरी रूद्रवार, पांडुरंग पौळ,नंदकिशोर मुंदडा, बापुराव आंबोरे,माजी जि.प.सदस्य रामराव आंबोरे, रामनारायण मुंदडा, तंटामुक्ती अध्यक्ष सुधाकर आंबोरे,भगवान लाकडे, सत्यनारायण मुंदडा, मदनलाल मुंदडा, कैलास मुंदडा, सुदर्शन आंबोरे,दत्तराव आंबोरे, बबनराव बोचरे,गोरख आवरगंड, गंगाधर चौधरी ,सचिव शंकर देशमुख, महेश मुंदडा ग्रेडर केवलजी व बाजार समितीचे कर्मचारी,शेतकऱ्यांची उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या