🌟पुर्णा पोलीस स्थानकाचा अल्पकालावधीत स्वखर्चातून कायापलट करणारा असाही एक दिलदार मनाचा पोलीस अधिकारी....!


🌟पोलिस निरीक्षक प्रदीपजी काकडे यांच्या कौतुकास्पद उपक्रमाचे सर्वस्तरातून होत आहे कौतुक🌟


 
✍🏻वृत्त विशेष : चौधरी दिनेश (रणजित)

पोलिस प्रशासनात कार्यरत असतांना देखील आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून परिवर्तनवादी धोरणाचा अवलंब करीत सर्वसामान्य जनतेच्या मनात पोलीस प्रशासनाप्रती आदरभाव निर्माण करुन आपल्या कर्तृत्वाची जनसामान्यांच्या हृदयावर छाप सोडणारे पोलिस अधिकारी/कर्मचारी पोलिस प्रशासनात देखील कार्यरत असू शकतात काय ? असा प्रश्न तुम्हाला देखील विचलित करु शकतो परंतु थोर समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यभूमी असलेल्या कोल्हापूर नगरीचे भुमिपुत्र असलेले श्री प्रदीपजी काकडे हे परिवर्तनवादी कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी परभणी जिल्ह्यातील पोलिस दलात कार्यरत असून परभणी जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिक्षक सन्माननीय रागसुधाजी आर.यांनी त्यांच्याकडे जेष्ठ पोलीस निरिक्षक म्हणून पुर्णा पोलीस स्थानकाचा पदभार सोपविला आहे.


परभणी जिल्ह्यातील अतिसंदनशील तालुका म्हणून शासन दप्तरी नोंद असलेल्या पुर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक म्हणून श्री.प्रदिपजी काकडे यांनी जुलै २०२३ या महिन्यात पदभार स्विकारला अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत पो.नि.काकडे यांनी पुर्णा पोलीस स्थानकात कमालीची सुधारणा केल्याने निदर्शनास येत असुन ते पुर्णा पोलीस स्थानकात रुजू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पोलीस स्थानकासह संपूर्ण तालुक्यात परिवर्तनाला सुरुवात झाल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत असून आपण कर्तव्य बजावत असलेल्या पुर्णा पोलीस स्थानकाच्या इमारतीसह परिसराच्या झालेल्या दुरावस्थेच्या दुरुस्ती संदर्भात परभणी जिल्ह्यातील पोलीस महासंचालकांच्या वार्षिक तपासणी दौऱ्याचे औचित्य साधून ठोस पाऊल उचलून संपूर्ण परिसर नंदनवनात रुपांतरीत कसा करता येईल या दृष्टीने त्यांनी तात्काळ उपाययोजना करीत प्रथमतः पोलीस स्थानकाच्या इमारतीसह परिसराच्या स्वच्छतेला प्राधान्य देवून इमारतीच्या सुंदर अश्या रंगरंगोटीसह दुरुस्तीचे देखील काम हाती घेतले.पुर्णा पोलीस स्थानकाच्या इमारत परिसरात विविध गुन्ह्यातील तसेच गौण खनिज तस्करीतील जप्त करण्यात आलेली अनेक वाहन इमारतीच्या मागील भागात व्यवस्थीतरित्या लावून संपूर्ण परिसर मोकळा करण्यात आला तर निजामकालीन पुरातन विहीरीचे बांधकाम करुन ती पुरातन विहीर पोलीस स्थानकात पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने उपयोगात आणण्याची जबाबदारी देखील पार पाडण्याचे काम पो.नि.काकडे यांनी केले मागील अनेक वर्षापासून अदुरुस्त असलेली व मोडकळीस आलेली संपूर्ण लाईट फिटींगचे नुतनीकरण पाणीपुरवठा पाईपलाईनचे नुतनीकरण,इमारती अंतर्गत असलेल्या पोलीस निरीक्षक कक्ष, ठाणे अंमलदार कक्ष,गोपनीय शाखा कक्ष,जमादार कक्ष,आरोपींची कोठडी, पुरुष/महिला पोलिस कर्मचारी विश्रामगृह,पोलीस स्थानकातील सर्व स्वच्छता गृह आदींच्या दुरुस्तीं/नुतनीकरणासह रंगरंगोटी,पुर्णा पोलिस स्थानकाच्या जुन्या वास्तूचे फोटो तसेच विविध सुचनांचे फलक,बोअरवेल दुरुस्ती,वायरलेस वायरिंगचे नुतनीकरण,वॉटर फिल्टर दुरुस्ती करुन अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,फर्निचर/खिडक्यांना नवीन पडदे,परिसरात वृक्षारोपणासाठी काळ्यामातीची व्यवस्था,हॉलीबॉल खेळण्यासाठी सुसज्ज असे मैदान,आदी महत्त्वपूर्ण सुधारणा पोलीस निरीक्षक प्रदीपजी काकडे यांनी शासनासह कोणाही कडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता स्वखर्चातून केल्याने त्यांच्या या कार्यकर्तव्यतत्परतेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या