🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे अयोध्येतील कलश व अक्षदाचे पुजन व शोभायात्रा संपन्न.....!


🌟श्रीराम मंदिरात श्रीराम आनंदोत्सव समितीच्या वतीने मंगल अक्षदा व कलशाचे विधिवत पूजन करण्यात आले🌟


पुर्णा : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षदा व कलशाचे पूजन करून हजारों भाविकांच्या उपस्थितीत ताडकळस शहरातील प्रमुख रस्त्यावरून भव्य मिरवणूक दि.३१ डिसेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास नवा मोंढा ताडकळस येथील  हनुमान मंदिर  येथून हनुमान चालीसा पठण व महाआरती कलश यात्रेला प्रारंभ झाला.ही कलश यात्रा मुख्य बाजार पेठ, बस स्टँड,हटकर गल्ली,  मार्गे श्री राम मंदिर पर्यंत काढण्यात आली. श्रीराम मंदिरात श्रीराम आनंदोत्सव समितीच्या वतीने मंगल अक्षदा व कलशाचे विधिवत पूजन करण्यात आले.

शोभायात्रे दरम्यान रस्त्यात महिला भाविक भक्तांनी  मंगल अक्षदा व कलशाचे विधिवत पूजन केले. या शोभायात्रेत सर्व ताडकळस व परिसरातील भजनी मंडळी, प्रसिद्ध नागरिक, महिला, प्रतिष्ठित व्यापारी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी ,माजी सरपंच,जिल्हा परिषद सदस्य,शोभायात्रेत विविध क्षेत्रातील मान्यवर शोभायात्रा घेऊन मंगल अक्षदांचे पूजन करून दर्शन घेतले, शोभयात्रेच्या अग्रभागी रस्त्यावर तरुणांनी रांगोळी काढून फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार प्रभु श्रीराम की जय,सह विविध घोषणाबाजीने संपूर्ण ताडकळस नगरीचे लक्षवेधले होते. श्रीराम मंदिर येथे शोभायात्रेचा प्रभू रामचंद्राच्या महाआरतीने समारोप झाला. उपस्थित नागरिकांना श्रीराम आनंदोत्सव समितीच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

अक्षदा कलश शोभायात्रा मध्ये उत्तम नाना आंबोरे,आलोक महाजन, पत्रकार गजानन नाईकवाडे,पत्रकार देवानंद नावकिकर, नागनाथ सारोळे, नागेश आंबोरे, आशुतोष आंबोरे,गजानन कदम,आदींनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या