🌟परभणीत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे आयोजन...!


🌟जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन दि.19 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे🌟

परभणी (दि.16 डिसेंबर) : समस्याग्रस्त व पीडित महिलांनी मंगळवार,दि.19 डिसेंबर, 2023 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. परंतु 18 डिसेंबर, 2023 रोजी जिल्ह्यात ‘चंपाषष्टी’ निमित्त स्थानिक सुट्टी असल्यामुळे माहे डिसेंबर 2023 या महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन मंगळवार, दि. 19 डिसेंबर, 2023 रोजी करण्यात आले आहे.

मंगळवार, दि. 19 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित राहावे. समस्याग्रस्त व  पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा तसेच समाजातील त्यांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. तरी जिल्ह्यातील महिलांनी त्यांच्या वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी विहीत नमुन्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, परभणी यांच्या कार्यालयात दाखल करण्यात याव्यात,  असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी केले आहे.... 

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या