🌟सूर्यपुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकराच्या जयंती निमित्त अभिवादन....!


 🌟संविधान ग्रंथ व संविधान प्रस्ताविकांचे वाटप व वाचन🌟


परभणी : सूर्यपुत्र यशवंत तथा भैय्यासाहेब आंबेडकरांची 111 वी जयंती संबोधी विद्यालय मध्ये संपन्न झाली या कार्यक्रमाचे नियोजन रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी केले होते या कार्यक्रमात संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून प्रस्ताविका व संविधान ग्रंथाचे वाटप करण्यात आले या वेळेस बोलताना विजय वाकोडे यांनी सांगितले की सूर्यपुत्र यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकरांनी खंबीर पणे चळवळीचे नेतृत्व केले भारतीय बोद्ध महासभेचे कार्य पुढे नेऊन, ऐतिहासिक चैत्यभूमी निर्माण करून बाबासाहेबांचे साहित्य प्रकाशन करण्याचे महत्व पूर्ण जबाबदारीचे कार्य त्यांनी केले, आंबेडकरी चळवळ या सूर्यपुत्राची नेहमीच ऋणी राहील अशे वाकोडे यांनी बोलताना सांगितले सदरील कार्यक्रम संबोधी विद्यालय परभणी येथे संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश मालसंमीदर यांनी केले या कर्मचाच संयोजण परभणी प्रभारी आशिष वाकोडे यांनी केले

या कार्यक्रमांस शेषेराव जल्हारे भीमराव पंतगे, बाळासाहेब पैठणे, निलेश डुमने, प्रवीण गायकवाड, गौतम खिल्लारे, हर्षराज खिल्लारे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शेकडो विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीत गाऊन झाला.....
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या