🌟थायलंड देशातील बँकॉक येथील भव्य बौद्ध विहारात आयोजित दिक्षा समारंभास डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांची हजेरी.....!


🌟भारतीय राजदूत नरेश सिंह यांची देखील विशेष उपस्थिती : १०० श्रामणेर भिक्खू संघाचा भव्य दीक्षा समारंभ🌟  

परभणी :  थायलंड या देशातील बँकॉक येथील भव्य बौद्ध विहारात आयोजित केलेल्या १०० श्रामणेर भिक्खू संघाच्या भव्य दीक्षा समारंभास थायलंड येथील भारतीय राजदूत  नरेश सिंह यांच्यासह आयोजक सिने अभिनेते गगन मलिक, डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांची उपस्थिती होती.


         भारतातून थायलंड देशात पहिल्यादांच हा समारंभ आयोजित केला असून थाई भिक्खू संघाच्या व मान्यवरांच्या उपस्थित हा ऐतीहासिक समारंभ गुरुवार २१ डिसेंबर रोजी पार पडला.थायलंड येथे आयुथया ते नाखून सावन पर्यंत आयोजित केलेल्या धम्मयात्रेत ४७ भिक्खू व ३३ उपासकांचा सहभाग असून एक महिनाभर श्रामणेर भिक्खू यांना धम्मदीक्षा देण्यात येणार आहे  हा समारंभ थायलंड येथील फ्रास धिरनामुनी आणि थाई भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली व वेट थोंग रॉयल बुद्ध विहार, फ्रा राजवरोयनानसोफेन, फ्रा ब्रम्हावाजिराकोर्न, फ्राधम्मसाक्यावोंगविसुधी  इत्यादी प्रमुख भिक्खू संघाच्या उपस्थितीत पार पडला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या