🌟अयोध्येतील बाबरी मस्जीद पुर्नस्थापित करुन बाबरी मस्जीद विध्वंस करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा....!


🌟पुर्णेतील मुस्लिम बांधवांनी तहसिलदार/पोलीस प्रशासना मार्फत राष्ट्रपतींना पाठवले निवेदन🌟

परभणी/पुर्णा (दि.०६ डिसेंबर) - उत्तर प्रदेश राज्यातील आयोध्या येथील बाबरी मस्जीद पुर्नस्थापित करुन बाबरी मस्जीद विध्वंस करणाऱ्यां विरुध्द कायदेशीर कार्यवाही करुन सदरील घटला जलद गतीने न्यायालयात चालवून या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा करा अशी मागणी एका निवेदनाद्वारे आज बुधवार दि.०६ डिसेंबर रोजी पुर्णेतील मुस्लिम समाज बांधवांनी तहसिलदार माधवराव बोथीकर व पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रदीपजी काकडे यांच्या मार्फत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की आयोध्या येथे दि.०६ डिसेंबर १९९२ रोजी अस्तित्वात असलेली बाबरी मस्जीद ही काही समाजकंठक लोकांकडून उध्दवस्त करण्यात आली होती व दोन समाजात तेढ निर्माण करण्यात आले होते. परंतु सदरील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे दि.०९ नोव्हेंबर २०१९ रोजी निकाल दिला आणि त्यानिकाला विरुध्द ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने  पुर्नविचार याचीका (Review Petition) दाखल केली होती ती सुध्दा निर्णयीत झाली आहे. तसेच भारतातील सर्व मुस्लीम समाजाला सदरील पुर्नविचार याचीकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून योग्य तो न्याय मिळण्याची आशा होती परंतु ती मावळली. उपरोक्त सर्वोच्च न्यायालयाचे आदेश हे समाधानकारक नसून सर्व मुस्लीम समाजाविरुध्द असून त्यामुळे समाजामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे व मुस्लीम धर्मियांचे मने दुखावलेली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले असून पुढे निवेदनात असे नमूद करण्यात आले की दि.०६ डिसेंबर १९९२ रोजी घडलेली ही बाबरी विध्वंसाची घटना अत्यंत दुःखद घटना असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा मान्य केले आहे व सदर घटना आज रोजी सुध्दा मुस्लीम समाजाच्या मनात कोरली गेलेली आहे, ती कोणत्याही स्वरुपात भरता येणार नाही. बाबरी मस्जीद विघवंश हा जगासमोर भारताची मान खाली घालवणारी घटना आहे व आपल्या देशाला कलंकारक कृत्य आहे व ते कृत्य मिटविण्यासाठी या विधवंशातील आरोपींना न्यायालयाकडून क्लिनचिट देण्यात आलेली आहे त्यासंदर्भात राज्य शासनाने अपील दाखल केलेले नाही त्या आरोपी विरुध्द अपील दाखल करण्यासंदर्भात राज्य शासनाला आदेशीत करण्यात येवून मुस्लीम समाजाला योग्य तो न्याय द्यावा व आयोध्या येथे बाबरी मस्जीद पुर्नस्थापीत करण्यासाठी योग्य त्या उपाय योजना कराव्यात यावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनावर एमआयएम पक्षाचे तालुकाध्यक्ष मोहम्मद शफीक,सामाजिक कार्यकर्ते ईलियास भाई,टिपू सुलतान ग्रुप अध्यक्ष सरान बागवान,नगरसेवक अमजद नूरी माजी,सामाजिक कार्यकर्ता शेख इरफान,एमआयएम कार्याध्यक्ष हबीब बागवान,शेख मोहम्मद,शेख अक्रम,दिपक थोरात आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या