🌟परभणीत तयार झालेल्या एनएच-६१ शाॅर्ट सिनेमाची 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ॲवार्डसाठी निवड.....!🌟'जगात जर्मनी भारतात परभणी' या म्हणीला साजेल असे कर्तृत्व परभणीतील कलावंतांनी केले🌟परभणी (दि.१९ डिसेंबर) - 'जगात जर्मनी भारतात परभणी' या म्हणीला साजेल असे कर्तृत्व परभणीतील कलावंतांनी एनएच-६१ शाॅर्ट सिनेमाच्या माध्यमातून दाखवल्याने 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ॲवार्ड -२०२४ मध्ये परभणीच्या नावासह या शाॅर्ट सिनेमाचा देखील डंका वाजणार असून एनएच-६१ शाॅर्ट सिनेमाची 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ॲवार्ड - २०२४ साठी निवड करण्यात आली आहे या फेस्टिव्हल मध्ये दाखवण्यासाठी देश-विदेशातून अनेक सिनेमांमधून ज्या टाॅप-१०० सिनेमा दाखवल्या जाणार आहेत त्यात आपल्या परभणीच्या युवकांनी राष्ट्रीय महामार्गावर बेदरकारपणे गाड्या चालवल्यामुळे निष्पाप लोकांचे जे बळी जातात व त्यात स्वत: सोबत इतरांचही जीवन उद्ध्वस्त होत असत हा दैनंदिन जीवनातला जिव्हाळ्याचा विषय घेऊन एनएच-६१ हा शाॅर्ट सिनेमा बनवला आणि तो सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये दाखवला जाणार असून ही बाब निश्चितच परभणीकरांसाठी अभिमानास्पद आहे. 

      या फिल्मची निर्मीती, लिखाण,संवाद :- कार्तिक विश्वामित्रे, एडिटींग व सिनेमॅटोग्राफी :- आर्यन पाटोळे,दिग्दर्शन :- आर्यन पाटोळे आणि कार्तिक विश्वामित्रे, संगीत:- साकार देशपांडे व आर्यन पाटोळे,व्हाईस रेकाॅर्डीस्ट :- सुबोध जैन,रेडीओ व्होकोलिस्ट :- अनुष्का पुराणिक यांनी केले तर यामध्ये माधुरी लोकरे,अतुल साळवे आणि कार्तिक विश्वामित्रे या कलावंतांनी आपापल्या भूमिकेतून एनएच-६१ चा विषय लोकांपर्यंत पोहोचवला यासाठी वैभव कुंभारकर यांचेही सहकार्य लाभलं या त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून पुढील यशासाठी त्यांना सर्वांचे आशिर्वादही मिळत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या