🌟महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना पूर्णा तालुका शाखेचा विस्तार व नागपूर पेंशन जनक्रांती महामोर्चा नियोजन सहविचार सभा संपन्न....!


🌟सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संपर्कप्रमुख पंढरीनाथ ठाकूर यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 

पुर्णा (दि.08 डिसेंबर) - पुर्णा तालुक्यातील सर्व विभागातील पेंशन फायटर्स यांच्या उपस्थितीत दि.06 डिसेंबर 2023 रोजी अभिनव विद्या विहार प्रशाला,(बसस्टँड जवळ)पूर्णा येथे  आयोजित करण्यात आलेल्या सहविचार सभेत महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेचा विस्तार करण्यात आला.सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संपर्कप्रमुख पंढरीनाथ ठाकूर तर या प्रमुख पाहूणे म्हणून परभणी जिल्हा कोषाध्यक्ष अरविंद दवणे,प्रमुख पाहुणे पैठणे नगरपरिषद पुर्णा हे होते.

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्वप्रथम महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.व तसेच रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सहविचार सभेत 12 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथे होणाऱ्या पेंशन जनक्रांती महामोर्चा विषयी अरविंद दवणे यांनी केलेल्या सखोल मार्गदर्शनातून सर्वांना नागपूरला येण्याचे आवाहन केले.

त्यानंतर लगेच महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेचा विस्तार करण्यात आला.सर्व निवड प्रक्रिया सर्वानुमते पार पडली.तालुकाध्यक्ष आबनराव पारवे,सचिव रामेश्वर भोसले,कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत कदम,कोषाध्यक्ष विलास बोकारे,प्रसिद्धी प्रमुख युवराज वाघमारे,सल्लागार  प्रमोद आंबोरे,

प्रवक्ता भागवत शिंदे,सहसचिव  गणेश कुऱ्हे,उद्धव राठोड,विनोद मेडेवाड,महिला प्रतिनिधी- सुचित्रा झोरे, नीता गाढवे,रसिका पळसकर,उपाध्यक्ष- कुरेशी शेख रौफ,तुकाराम चव्हाण,बंडू गायकवाड,संदिप आंबोरे,प्रा.मकरंद कुलकर्णी,दत्ता राऊत,रामा रासवे, नरहरी सातपुते,बालाजी निलावाड,श्रीरंग खंदारे,नागनाथ आडबलवार,पुर्णा शहर संघटक प्रविण आंबोरे,

केंद्रसंघटक-कन्या पूर्णा-अमित पाटील,माटेगाव-बालाजी मोरे,चुडावा-उद्धव बाबर,कावलगाव- विठ्ठल आरळे,ध.टाकळी-संतोष अन्नमवार,ताडकळस-गजानन मिसाळ,फुलकळस-तानाजी कळसाईतकर,देऊळगाव दु.-सुनिल मोरे,पिंपळा लो.-राहुल लोखंडे,गणपूर-संगिता कदम आदींची उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन- भागवत शिंदे यांनी केले तर आभार आबनराव पारवे यांनी मानले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक-विलास बोकारे यांनी केले.अध्यक्षीय समारोप पंढरीनाथ ठाकूर यांनी केला.

सर्व कार्यकारिणी विस्तार प्रक्रिया अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.जिल्हा पदाधिकारी व उपस्थित कर्मचारी यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या