🌟साहित्य संमेलनाचे नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ.चंद्रकांत लेनगुरे यांची झाडी बोली साहित्य संमेलन स्थळी भेट.....!


🌟या भेटीदरम्यान बामणी येथील झाडी बोली मंडळाचे पदाधिकारी/सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते🌟

गडचिरोली (दि.१० डिसेंबर) - ३१ वे झाडी बोली साहित्य संमेलन बामणी खडकी ता.सडक अर्जुनी जि.गोंदिया या ठिकाणी दि.१६ व १७ तारखेला होत आहे. या साहित्य संमेलनाचे नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ.चंद्रकांत लेनगुरे यांनी सदर ठिकाणी कवी उपेंद्र रोहणकर व खेमदेव हस्ते यांचेसोबत नुकतीच भेट दिली. 

      भेटीदरम्यान बामणी येथील झाडी बोली मंडळाचे पदाधिकारी/सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. त्यांचे सोबत संमेलनाध्यक्ष महोदयांनी संमेलनाच्या नियोजनाचा आढावा घेतला. या चर्चेत गावचे सरपंच तथा स्वागताध्यक्ष विलासजी वट्टी उपसरपंच तथा सहस्वागताध्यक्ष विकास खोटेले, समन्वयक नागेशजी भेंडारकर, सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष प्रदीप मेश्राम, सांस्कृतिक विभागाचे सहअध्यक्ष किशोरजी तरोणे, झा.बो.शाखा प्रमुख मुरलीधर खोटेले, कार्याध्यक्ष चंद्रकुमार बहेकार, विलासजी शिवशंकर, प्रदीप मेश्राम, चैताराम पाथरे, रमेश कोरे, तुलशीदास खोटेले, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक व्ही.जी.कोकोडे इत्यादी मंडळीनी भाग घेतला. आयोजनाच्या सुरेख तयारीबाबत संमेलनाध्यक्ष डॉ.चंद्रकांत लेनगुरे यांनी समाधान व्यक्त केले. अशी माहिती आमच्या न्यूजनेटवर्क कार्यालयास श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींनी दिली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या