🌟खबरदार यापुढे दारुड्याला दारुडा म्हणाल तर.....कर्नाटकात मद्यप्रीय संघर्ष समितीने विधानसभे समोर आंदोलन....!


🌟 कर्नाटक मद्यप्रिय संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आलेल्या मागण्यांची सध्या जोरदार चर्चा🌟 

ऐकावे ते नवलच...कर्नाटक राज्यात मद्यमींनी कमालीची एकजूट दाखवत दारुडा या उपहासात्मक शब्दावर बंदी घालावी ज्याने मद्यपींना देखील समाजात सन्मानाची वागणूक मिळेल या आगळ्यावेगळ्या मागणीसाठी चक्क कर्नाटक मद्यप्रिय संघर्ष समितीची स्थापना करीत आपल्या विविध मागण्यांसाठी राज्याच्या विधानसभे समोर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एकत्रित होऊन आंदोलन करीत आपल्या मागण्याचं निवेदन कामगार मंत्री संतोष लाड यांना दिले कर्नाटक मद्यप्रिय संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आलेल्या मागण्यांची सध्या संपूर्ण कर्नाटक राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे.


कर्नाटक मद्यप्रिय संघर्ष समितीच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनात दारूडा शब्दावर बंदी आणून मद्यप्रिय म्हणा असे नमूद करण्यात आले असून ३१ डिसेंबर हा मद्यप्रेमींचा दिवस घोषित करण्याची तसेच मद्यप्रेमींना देखील विमा योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली असून निवेदनात मद्यप्रेमींच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची तसेच मद्य विक्रीतून येणाऱ्या नफ्यातून १० टक्के अनुदान मंजूर करण्याची मद्यपींच्यासाठी विशेष भवनाची उभारणी करण्याची व मद्यप्रेमींवर गुन्हे दाखल करण्यास प्रतिबंध करण्याची तसेच मद्यपींसाठी बियरबारमध्येच झोपण्यासाठी व्यवस्था करण्याची यासह मद्यपान केल्याने आरोग्यावर होणाऱ्या परिणामावर उपचार करण्यासाठी शासकीय मदत देण्यासह मद्यप्रेमींसाठी प्रत्येक निगम स्थापित करण्याची तसेच एका दारूच्या बॉटलवर इन्शुरन्स करण्याची देखील मागणी करण्यात आली असून गोरगरीब मद्यप्रेमींना आवास योजना मंजूर करण्याच्या मागणीचे निवेदन कर्नाटक मद्यप्रिय संघर्ष समिती या संघटनेच्या वतीनं कामगार मंत्री संतोष लाड यांना देण्यात आलं आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या