🌟सोनपेठ तालुक्यातील विटा येथे मा.आ.वैं.उत्तमराव विटेकर यांच्या ९ व्या पुण्यस्मरणा निमित्ताने स्मृती पुरस्कार सोहळा संपन्न..!


🌟या स्मृती पुरस्कार सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती 🌟


पुर्णा (दि.०६ डिसेंबर) - जगाचा पोशिंदा शेतकरी जो मनोभावे पंढरीच्या पांडुरंगाची भक्ती करतो तोच खरा वारकरी ही वडीलांची विच्यारसरणी घेवून पुढे वारसा चालवणे माझे कर्तव्य समजतो असे प्रतिपादन राजेश दादा विटेकर यांनी केले. 

     सोनपेठ तालुक्यातील  विटा येथील निर्मलाताई विटेकर यांच्या मळ्यात माजी आमदार वैं.उत्तमराव विटेकर यांच्या नवव्या पुण्यस्मरणा निमित्ताने स्मृती पुरस्कार सोहळा मंगळवार दि.०५ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजक राजेश दादा विटेकर,श्रीकांत विटेकर ,प्रमुख उपस्थिती परभणी जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे, हभप.भागवताचार्य बाळु महाराज गिरगावकर,हभप.त्र्यंबक महाराज दस्तापुरकर ,आमदार राहुल पाटील ,रत्नाकर गुट्टे ,रामप्रसाद बोर्डीकर , मोहनराव फड , मा . खासदार सुरेश जाधव ,अनिल नखाते , दादासाहेब टेंगसे ,गजानन आंबोरे , रितेश काळे यांच्या सह जिल्ह्यातील राजकीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.


  कार्यक्रमात ह भ प बाळु महाराज गिरगावकर यांनी आपल्या किर्तनात आई- वडील यांची मनोभावे सेवा करणे एवढेच शिक्षण आधुनिक तरूण पिढीने प्रामाणिकपणे आत्मसात करावे असे आवाहन केले . पुढे जिल्ह्यातील शेती ,वारकरी सामाजिक कार्यात  उत्कृष्ट काम करनाऱ्या मंडळीना सन्मानचिन्ह जोड आहेर पुरस्कार व ११००० हजार रुपये पोत्साहन देण्यात आले .भक्तीसांप्रदायात डॉशिवलिंग शोवाचार्य , अर्जुन लाड , पंजाब डख , साहेबराव कोठाळकर , भारत कानसुरकर ,भगवान इसादकर , तुकारम यादव , पंढरीनाथ कदम  अदीना वारकरी पुरस्कार देण्यात आला .  शेती क्षेत्रात माखणी येथील प्रगतसिल शेतकरी  जनार्धन आवरगंड ,पंडीतराव थोरात , मेघा देशमुख , कृष्णा भोसले ,शिवाजी गयाळ अदीना शेती क्षेत्रात विविध उपक्रम ,लघु उद्योग ,प्रक्रिया उद्योग करनार्याँना प्रोत्साहन देण्यात आले कार्यक्रमास वारकरी शेतकरी ,पंचक्रोशीतील भक्त भाविक व राजकीय पदाधिकारी महीला पुरूष उपस्थित होते . प्रास्ताविक आयोजक राजेश दादा विटेकर यांनी केले , सूत्रसंचालन संदिप लष्करे यांनी केले आभारप्रदर्शन ॲड . श्रीकांत विटेकर यांनी मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या