🌟पुर्णेत २१ व्या बौद्ध धम्म परिषदेच्या पूर्व तयारीसाठी बैठकीचे आयोजन.....!


🌟बुद्ध विहारात दि.२२ डिसेंबर रोजी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो हे राहणार🌟

पुर्णा (दि.२१ डिसेंबर) - बोधिसत्व डॉ.बी.आर.आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समिती पूर्णा च्या वतीने २१ व्या बौध्द धम्म परिषदेच्या पूर्व तयारीसाठी बुद्ध विहारात दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांची उपस्थिती राहणार आहे.  

पूर्णा शहरात गेल्या अनेक वर्षांपासून दिवंगत भदंत उपाली थेरो यांच्या स्मृती दिनानिमित्त ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी दोन दिवशीय  बौद्ध धम्म परिषदेच्या आयोजन केले जाते. या परिषदेला  देश विदेशातील भिक्खू संघ उपस्थित राहून मार्गदर्शन करीत असतात तसेच शहर जिल्ह्यासह मराठवाड्यातील हजारोच्या संख्येने उपासक महिला - पुरुष तरुण वर्ग ज्येष्ठ मंडळी सहभागी होत असतात.या निमित्त शहरात धम्म मिरवणूक काढण्यात येते. 

या बैठकीस  भिक्खू बोधी धम्मा,भंते पय्यावंश ,भंते संघरत्न यांची उपस्थिती राहणार आहे. बैठकीत धम्म परिषदेचे आयोजन करणे,  श्रामनेर शिबिर ,प्रचार इत्यादी विषयावर चर्चा करण्यात येईल. बैठकीस उपस्थित राहून धम्म कार्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव अॅड महेंद्र गायकवाड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या