🌟नानक साई फाऊंडेनची संत नामदेव घुमान सद्भावना यात्रा हिंगोली मार्गे दि.०४ डिसेंबर रोजी नांदेडला परतली....!


🌟नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख तथा जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकरे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा दरवर्षी आयोजित करण्यात येते🌟


नांदेड/पुर्णा (दि.०५ डिसेंबर) - "मजबूत बंधुभाव की सांज" ही संकल्पना घेऊन नानक साई फाऊंडेशनची नववी भक्त नामदेव घुमान सद्भावना यात्रा घुमान-चंदीगड-हरियाणा-हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील विविध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन काल हिंगोली पुर्णा मार्गे दि.०४ डिसेंबर २०२३ रोजी नांदेड ला परतली.

नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख तथा जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकरे यांच्या नेतृत्वाखाली हि यात्रा आयोजित करण्यात येते. श्री गुरुनानक देव व संत नामदेव महाराज  यांच्या जन्मदिनाचा सोहळा पंजाबात उत्सव रुपात साजरा करण्यात आला. नानक साई फाऊंडेशनची हजूर साहिब (नांदेड) ते घुमान (पंजाब) अशी संत नामदेव घुमान सद्भावना यात्रा २४ नोव्हेंबर २०२३ रोजी नांदेड येथून "दृढ बंधुभावाच्या सांजने" सुरू झाली होती. पूर्णा मार्गे पंजाबला रवाना होताना पूर्णा हिंगोली येथे यात्रेचे जोरदार स्वागत झाले होते. धर्मनगरी कुरुक्षेत्र,बस्सी पठाणा, दम्हेडी पिंड, चंदीगड, आनंदपूर साहिब, नैना देवी, लुधियाना,रामतीर्थ (लवकुश जन्मस्थल) भाकरानंगल धरण, घुमान, अचल धाम, बटाला वाघ बॉर्डर,लुधियानाला भेट देउन यात्रा आज ४ डिसेंबर रोजी सांयकाळी हमसफर एक्सप्रेस  ने (12752) अकोला हिंगोली मार्गे पूर्णा नांदेड ला परतली.. या यात्रेत २९८ भाविक सहभागी झालेले आहेत. पूर्णा येथे पोलीस निरिक्षक प्रदिप काकडे,सैयद सलीम यांच्या वतीने यात्रेचे आदरतिथ्य करुन यात्रा नांदेडकडे रवाना केली. यात्रा नांदेड ला पोहचल्यानंतर तेथे हि यात्रेचे  पुष्पवृष्टी ने जोरदार असे स्वागत झाले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या