🌟परभणी जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन....!


🌟जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींनी या ऑनलाईन सत्रामध्ये सहभाव नोंदवावा - सहायक आयुक्त प्र.सो.खंदारे 

परभणी (दि.08 डिसेंबर) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयामार्फत  जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी 28 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता व्यक्तिमत्व विकास व करियर समुपदेशन या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. 

कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त प्र.सो.खंदारे व सेलू नूतन महाविद्यालयातील सूक्ष्म-जीवशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक अमित कुलकर्णी  मार्गदर्शन करणार आहेत.जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींनी या ऑनलाईन सत्रामध्ये सहभाव नोंदवावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त प्र.सो. खंदारे यांनी केले आहे......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या