🌟नांदेड रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वे प्रवासी बोगीला भिषण आग....!


🌟बोगीला आग लागण्याच्या घटनेने रेल्वे स्थानकावर प्रवाशांत प्रचंड दहशत निर्माण झाल्याचे चित्र देखील पहावयास मिळाले🌟

नांदेड (दि.२६ डिसेंबर) - हुजूर साहीब नांदेड येथील रेल्वे स्थानकावर साफसफाई व दुरूस्तीसाठी उभा असलेल्या प्रवासी रेल्वे बोगीला आज मंगळवार दि.२६ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ०९-०० वाजेच्या सुमारास अचानक भाषण आग लागल्याची घटना घडली. या घटने संदर्भात माहिती मिळताच रेल्वे अधिकारी/कर्मचाऱ्यांनी तात्काळ धावपळ करीत आग विझवल्याने मोठा  अनर्थ टळला यावेळी रेल्वे बोगीला आग लागण्याच्या घटनेने रेल्वे स्थानकावर प्रवाशांत प्रचंड दहशत निर्माण झाल्याचे चित्र देखील पहावयास मिळाले.

रेल्वे स्थानकावर साफसफाई व दुरूस्तीसाठी उभा असलेल्या रेल्वेच्या एका बोगीला अचानक आग लागल्याची घटना घडली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केल्याने बोगी जळून खाक झाली. रेल्वेच्या वरीष्ठ अधिकारी व कर्मचा-यांनी धावपळ करीत आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला. परंतू ही आग नेमकी कशामुळे याबद्दलची माहिती समजू शकली नाही. दरम्यान या घटनेमुळे प्रवाशांमध्ये धावपळ सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळाले......


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या