🌟परभणीचे भुमिपुत्र ऋतुराज भक्तराज भोसले यांना 'गिरनार रत्न' पुरस्कार प्रदान....!


🌟ऋतुराज भोसलेंना मिळालेला पुरस्कार हा परभणीकरांची मान अभिमानाने ऊंचावनारा🌟

परभणी (दि.०६ डिसेंबर) - गुजरात राज्यातील जुनागढ येथे दि.०१ डिसेंबर ते दि.०५ डिंसेबर २०२३ दरम्यान पटेल कल्चरल फाउंडेशन, मुंबई द्वारा आयोजित १० वा गिरनार महोत्सव संपन्न झाला सदर कार्यक्रमात ५ डिंसेबर रोजी ऋतुराज भोसले यांचे पखावज वादन झाले. त्यात त्यांनी ताल चौताल मध्ये वादन करत सार्थक निरर्थक परण, त्रिपुरारी आरती परण वाजवून रसिक श्रोत्यांची मने जिंकली

पखावज वादना नंतर मुळ खपाट पिंपरी ता.सोनपेठ जि.परभणी येथील ऋतुराज भोसले पखावज वादनाच्या माध्यमातुन भारतीय शास्त्रीय संगीतासाठी करत असलेल्या कार्याची दखल घेत पटेल कल्चरल फाउंडेशन, मुंबईने ऋतुराज यांना “गिरनार रत्न २०२३” या पुरस्काराने सन्मानित केले. या पुर्वी देशातील दिग्गज कलाकारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. 

प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. एम. के. पटेल, जुनागढ नगर पालिका नगराध्यक्ष, जुनागढ जिल्हाधिकारी, सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय, वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्ती आणि महोत्सवात आपली कला सादर करण्याकरीता देशातील आठ राज्यातुन आलेले प्रतिष्ठित कलाकार उपस्थित होते.

ऋतुराज भोसलेंना मिळालेला पुरस्कार हा परभणीकरांची मान अभिमानाने ऊंचावनारा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या