🌟अशी मागणी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अक्षय डहाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्री बनसोडे यांच्याकडे केली🌟
परभणी (दि.28 डिसेंबर) : परभणी सारख्या महानगरासह जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावरसुध्दा आपले कला-कौशल्य दाखविता यावे या दृष्टीने परभणीत अत्याधूनिक व सर्व सुविधांनी युक्त सुसज्ज असे क्रिडांगण उभारावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय चंद्रकांत डहाळे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने केली.
राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांना जिल्हा प्रशासनामार्फत सादर केलेल्या निवेदनात, परभणी सारख्या महानगरात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा व्हाव्यात त्यातून स्थानिक खेळाडूंना कला, कौशल्य दाखविण्यासाठी वाव मिळावा म्हणून क्रिडांगणे गरजेचे आहेत. सेन्थेटीक, रनिंग ट्रॅक, फुटबॉल ग्राऊंड, हॉकी ग्राँड, स्कटींग ट्रॅक व इतर खेळांसाठी मैदाने आवश्यक आहेत. तरच स्थानिक खेळाडूंना खेळाचे प्रदर्शन करता येईल, प्रशिक्षणही घेता येईल. त्यामुळे राज्याच्या क्रिडा विभागाने या सुसज्ज अशा क्रिडांगणाकरीता मोठ्या प्रमाणावर तरतूद करावी, अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष डहाळे, रामदास पवार, माऊली कोपरे, ओम मुदीराज, एकनाथ चव्हाण, ओंकार कदम, हनुमान भालेराव, अनिल रेंगे, चैतन्य कोठेकर, ओम राजे रेंगे व संजय रिझवानी यांनी केली......
0 टिप्पण्या