🌟जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांचा सिनेस्टाईल पाठलाग : दुचाकीला धडक देत चोरट्यांनी पळवले ०४ लाख रुपये....!


🌟पुर्णा-नांदेड मार्गावरील गौर शिवारातील घटना : घटनेत दुचाकीचा अपघात झाल्याने दोन कर्मचारी जखमी🌟 


परभणी/पुर्णा (दि.०७ डिसेंबर) - पुर्णा तालुक्यातील चुडावा येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेतील दोन कर्मचारी  आपल्या दुचाकीवरून बँकच्या ०४ लाख रुपयांची रक्कम घेऊन जात असतांना या कर्मचाऱ्यांच्या पातळीवर असलेल्या दोन भामट्यांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करीत त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक देत अपघात घडवून त्यांच्या जवळील ०४ लाख रुपयांची रक्कम पळवल्याची घटना आज गुरुवार दि.०७ डिसेंबर २०२३ रोजी भरदिवसा सकाळी ११-०० वाजेच्या सुमारास पुर्णा-चुडावा-नांदेड राज्य मार्गावरील गौर शिवारात घडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

पुर्णा तालुक्यातील परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेसह पुर्णा चुडावा ताडकळस पिंपळा लोखंडे कावलगाव आदी गावांमध्ये परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा कार्यान्वित असून चुडावा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील शेतकऱ्यांचे अनुदान वाटप सुरु करण्यात आले असल्याने आज गुरुवार दि.०७ डिसेंबर रोजी चुडावा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रक्कम संपल्याने शाखा व्यवस्थापक बळीराम सखाराम हानवते व बँकेतील चपराशी शिवराम गायकवाड हे दोन कर्मचारी पुर्णा शहरातील मोंढा बाजार परिसरातील मुख्य शाखेतून ०४ लाख रुपयांची रक्कम घेऊन आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच २२ - एएस ५३७५ या दुचाकीवरून चुडावा शाखेकडे निघाले असतांना त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या दोन चोरट्यांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करीत गौर शिवारात त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक देत अपघात घडवून त्यांना गंभीर जखमी केले व त्यांच्या जवळील ०४ लाख रुपयांची रक्कम हिसकावून घेत धनगर टाकळी फाट्यावरून दोन्ही चोरटे पसार झाले सदरील घटनेची माहिती जखमी कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांसह पोलिस प्रशासनाला देखील तात्काळ कळवली असता परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वरिष्ठ अधिकारी विठ्ठलराव काळे,पुर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रदीपजी काकडे,चुडावा पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोमनाळकर, सहाय्यक पोलिस निरिक्षक लहाणे, जमादार चाऊस, पोलीस कर्मचारी शिंदे तात्काळ घटनास्थळी रवाना झाले यावेळी त्यांनी जखमींची विचारपुस करुन त्यांना उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात रवाना केले व घटनेतील चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सर्वत्र नाकाबंदीचे आदेश जारी करुन चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथक देखील रवाना केली.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या