🌟सेलू शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे योगदान मोलाचे - गजानन वाघमारे


🌟ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज यात्रा महोत्सवानिमित्त आयोजि स्पर्धा समारोपप्रसंगी ते म्हणाले🌟

सेलू (दि.27 डिसेंबर) - शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार होणे महत्त्वाचे असते.यामधून चांगले विचार जोपासले गेले पाहिजेत.तसेच विद्यार्थ्यांनी सध्या चिंता करण्यापेक्षा चिंतन करण्याकडे भर दिला पाहिजे आणि हेच चिंतन शालेय जीवनात आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमधून होत असते.सेलू शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांनी केले.

ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या यात्रा महोत्सवानिमित्त गत 13 वर्षांपासून तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन केशवराज बाबासाहेब विद्यालय करत असते.आज दि 27 डिसेंम्बर रोजी या स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाचालक विष्णूपंत शेरे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे,गजानन भिते,प्रवीण माणकेश्वर,वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक प्रमोद देशमुख,पूजा तोडकर,मोहिनी पांडे,मुख्याध्यापक पी एस कौसडीकर,मुख्याध्यापक बी यु हळणे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

दि 23 डिसेंम्बर रोजी या तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे मुख्य उदघाटन झाले.यावेळी उदघाटक म्हणून संस्थेचे सचिव महेशराव खारकर,श्री केशवराज बाबासाहेब संस्थानचे मुख्य पुजारी केशवराव मंडलिक,संचालक विष्णूपंत शेरे आदी प्रमुख उपस्थिती होते.यावेळी बालवाडी ते चौथी या गटासाठी रंगभरण स्पर्धा तर 5 वी  व 8 वी इयत्तेसाठी शिष्यवृत्ती परिक्षेवर आधारित परीक्षा घेण्यात आली.यामध्ये जवळपास 400 विद्यार्थी सहभागी झाले होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली कुरुडे यांनी केले.आज दि 27 डिसेंम्बर रोजी झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत अनेक शाळांनी सहभाग घेतला.यावेळी परीक्षक म्हणून प्रमोद देशमुख यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी वक्तृत्व स्पर्धेत 5 वी ते 7 वी च्या गटात अक्षरा गजानन पवार(नूतन कन्या प्रशाला-प्रथम),वैष्णवी कैलास लाटे(श्री के बा विद्यालय--द्वितीय),अथर्व प्रशांत चव्हाण (पोतदार इंग्लिश स्कुल-- तृतीय) तर 8 वी ते 10 वी गटात ज्ञानेश्वरी आसाराम रासवे(नूतन कन्या प्रशाला--प्रथम),अल्फिया अल्ताफ कुरेशी(नूतन कन्या प्रशाला--द्वितीय),सानिया सलीम तांबोळी(श्री के बा विद्यालय--तृतीय) यांनी क्रमांक पटकावले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी यु हळणे,सूत्रसंचालन योगेश ढवारे, बक्षीस वाटप मंगेश कुलकर्णी तर आभार सर्जेराव सोळंके यांनी मानले.

या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे :-

*रंगभरण स्पर्धा*

बालवाडी

प्रथम--आरोही संतोष आवटे (गोमतीबाई बालवाडी सेलू)


द्वितीय--सिद्धी रूपेश महाजन 

(नुतन प्रा.शा सेलू)

तृतीय --प्रसिद्धी अमोल महाजन

(बाहेती बिहाणी नुतन इंग्लिश स्कूल सेलू )


गट 1 ली व 2 री

प्रथम--आयुषा विष्णू काळे (विवेकानंद प्रा.शा सेलू)

द्वितीय--सय्यद आयशा स.अली

(के.बा विदयालय सेलू)

तृतीय--महाजन मनस्वी मंगेश

(पोदार इंग्लिश स्कूल सेलू)


गट 3 री व 4 थी

प्रथम--ज्ञानदा प्रदीप जोशी

(नुतन प्रा.शा सेलू)

द्वितीय--अंकिता मुक्ति राम फड

(के.बा विदयालय सेलू)

तृतीय--काव्या कैलास मरेवार

(विवेकानंद प्रा.शा सेलू)


शिष्यवृत्ती परीक्षा

इ.5 वी ते 7 वी

प्रथम--तन्मय जयकिशन भुतडा 

(नुतन विदयालय सेलू) 

द्वितीय--सान्वी गजानन शितळे

(नुतन विदयालय सेलू) 

तृतीय--सय्यद अरमान स.अली

(के.बा विदयालय सेलू) 


इ.8 वी ते 10 वी

प्रथम--सोहम सुरेश आर्दड

(नुतन विदयालय सेलू) 

द्वितीय--क्षितीजा कैलास खजिने

(प्रिन्स इंग्लिश स्कूल) 

तृतीय-शार्दुल विजय जोशी

(नुतन विदयालय सेलू)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या