🌟नांदेड येथील धम्माश्रय युवा विचार मंचकडून ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन....!


🌟महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अभिवादन: रक्तदान शिबिराचे १६ वे वर्ष🌟


नांदेड (दि.०१ डिसेंबर) - नांदेड येथील धम्माश्रय युवा विचार मंच या सामाजिक संघटनेकडून प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि.०६ डिसेंबर २०२३ रोजी श्रीनगर परिसरातील भाजीपाला मार्केट परिसरात सकाळी १०-०० ते साय.०५-०० वाजेच्या  सुमारास रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे

 धम्माश्रय युवा विचार मंच, प्रभात नगर, लुंबिनी नगर, कुशी नगर येथील मित्र परिवाराच्या वतीने महामानव परमपूज्य विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना प्रतिवर्षी महापरिनिर्वाण  दिनी महारक्तदान शिबिराचे आयोजन करुन अभिवादन केले जाते या महारक्तदान शिबिराचे हे १६ वेळ वर्ष असून या रक्तदान शिबिरात तमाम आंबेडकरवादी जनतेसह मित्र परिवाराने सहभाग नोंदवून महामानवाला रक्तदान करुन अभिवादन करावे व या रक्तदान शिबिरा नंतर सायंकाळी ०७-०० वाजता धम्माश्रय युवा विचार मंच कडून पैदल पणतीज्योत रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले असून ही रॅली भैय्यासाहेब आंबेडकर विहार ते प्रभात नगर पर्यंत निघणार असून या पणती ज्योत रॅलीत जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन धम्माश्रय युवा विचार मंचच्या वतीने करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या