🌟तांत्रिक कामगार युनियन चे राज्यव्यापी द्विवार्षिक महा अधिवेशन 7 जानेवारीला शिर्डीत....!


🌟पद्मविभूषण शरद पवार करणार उद्घाटन🌟

नागपूर (दि.२५ डिसेंबर) प्रत तांत्रिक कामगार युनियन रजि. नं.5059 चे राज्यव्यापी द्विवार्षिक अधिवेशन रविवार दिनांक 7 जानेवारी2024 रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे. तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे यांचे अध्यक्षतेखाली लोकनेते तथा केंद्रीय मंत्री पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार यांचे हस्ते उद्घाटन होणार आहे. तर ध्वजारोहण महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते होणार असल्याची माहिती तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने ह्यांनी एका प्रसिद्धीपञकाद्वारे दिली आहे.

यावेळी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे, अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, कोपरगाव चे आमदार आशुतोष काळे, श्रीरामपूरचे आमदार, आ.लहू कानडे , आ. सत्यजित तांबे यांचे सह मान्यवरांची प्रमुख पाहुणे म्हणून  उपस्थिती लाभणार आह. या अधिवेशनामध्ये स्मरणिका २०२४ चे प्रकाशन युवा आमदार रोहीत दादा पवार, तांत्रिक डायरी २०२४ चे प्रकाशन संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष प्रविन दादा गायकवाड,रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे,संघटनेच्या स्फूर्ती गीतार्पण आ. संतोष बांगर तर सुरक्षा पुस्तिका प्रकाशन नॅशनल लिस्ट ट्रेड युनियन फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव खटकाळे यांचे हस्ते होणार आहे.

यावेळी महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव (आय.ए.एस) ‌श्रीमती आबा शुक्ला, महावितरण चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (आय‌.ए.एस.) श्री लोकेश चंद्र, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आय ए एस अनबलगन, महापारेषण चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (आय.ए‌.एस.) डॉ. संजीव कुमार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून महावितरण चे (मासं) संचालक संजय ताकसांडे, अरविंद भादीकर,  संचालक सुगत  गमरे, (वित्त) संचालक अनुदीप दिघे, डॉ. धनंजय सावळकर, निर्मितीचे वित्त संचालक बाळासाहेब थिटे,मु.औ.सं. अधिकारी  संजय ढोके, महापारेषांचे मु औ.स. अधिकारी भारत पाटील, महानिर्मितीचे मु औ.स. अधिकारी पुरुषोत्तम वारजुरकर, तर प्रमुख अतिथी  म्हणून नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, उपमुऔ.स. प्रमोद राजे भोसले, महावितरण चे जनसंपर्क अधिकारी विकास आढे , शिर्डीचे नगराध्यक्ष कैलास(बापु) कोते, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, राष्ट्रवादी नेते रमेश गोंदकर, नगरसेवक अभय शेळके, साकोरी ग्रामपंचायतचे सरपंच मेघनाताई दंडवते यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लागणार आहे.

तांत्रिक कामगार युनियन रजि.न.5059 हे राज्यव्यापी द्विवार्षिक अधिवेशन रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी शिर्डी येथील राहता तालुक्यातील साकुरी गावाचे सिध्द  संकल्प लॉन मध्ये  संपन्न होत आहे. तांत्रिक कामगार युनियन ही कामगार संघटना स्वाभिमानी तांत्रिक कामगार चळवळीचे प्रणेते स्वर्गीय अब्दुल सलाम साहेब यांच्या विचारांना आदर्श मानून शोषित वंचित तांत्रिक कामगारांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करीत आहे. महावितरण ,महापारेषण महानिर्मिती मधील खाजगीकरण  , स्वतंत्र वेतन श्रेणी, निवृत्तीवेतन, वर्क नॉमर्स ठरविणे, वाढीव इंधन भत्ता, निर्माण  झालेली वेतन तफावत, सन 2023 ते 2028 पगारवाढ, सरळ सेवा भरती, कंत्राटी  कामगारांचे प्रश्न, नवीन कामगार कायदे, सामाजिक,आर्थिक प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी युनियनने चळवळीची मुळे तळागाळापर्यंत राज्यभर रुजवली आहेत. नवी दिशा नवा विचार व एक तांत्रिक कामगार, श्रेष्ठ तांत्रिक  कामगार रुजविण्यासह सक्षम कामगार चळवळ राज्यांमध्ये भक्कमपणे उभी करण्यासाठी हे अधिवेशन महत्वपूर्ण व दिशादर्शक ठरणार आहे.

तेव्हा या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन केंद्रीय उपाध्यक्ष बी आर पवार, सतीश भुजबळ , गोपाल गाडगे,सरचिटणीस प्रभाकर लहाने , केंद्रीय उपसरचिटणीस नितीन चव्हाण , शिवाजी शिवनेचारी,संजय उगले, संघटक महेश हिवराळे, राज्य सचिव आनंद जगताप,रघुनाथ लाड,  प्रकाश निकम, कोषाध्यक्ष गजानन अघम, मुख्य  कार्यालय प्रतिनिधी विक्रम चव्हाण, संजय पाडेकर,तांत्रिक टाइम्स संपादक सुनील सोनवणे,विवेक बोरकर,किरण कराळे,प्रकाश वाघ,कंत्राटी कामगार असोसियेशन चे कार्याध्यक्ष विक्की कावळे,सरचिटणीस शेख राहील आदि  सह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या