🌟तामिळनाडू चेन्नई येथील ३२ व्या राष्ट्रीय महिला आट्यापाट्या स्पर्धेत पाँडिचेरी संघ विजेता तर महाराष्ट्र संघ उपविजेता....!


🌟महाराष्ट्र संघातील विजयी खेळाडूंचे सर्व स्तरातून होत आहे कौतुक🌟


 
छत्रपती संभाजी नगर (दि.०१ डिसेंबर) - तामिळनाडू राज्याची राजधानी चेन्नई येथील आंतरराष्ट्रीय नेहरू स्टेडियमवर दि.२६ नोव्हेंबर ते ३० नोहेंबर दरम्यान ३२ वी ओपन महिला आट्यापाट्या स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेमध्ये २० राज्याने सहभाग नोंदविला होता या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पॉंडिचेरी राज्य संघाने तर द्वितीय क्रमांक महाराष्ट्र संघाने पटकावला महाराष्ट्र संघामध्ये प्राची चटप (भंडारा),वंशिका अनिल कांबळे (छत्रपती संभाजी नगर),मिताली गणवीर (भंडारा),श्रुती कडव (नागपूर),नेहा कांगटे (जळगाव),उर्वशी गुप्ता (अमरावती),शिल्पा डोंगरे(धाराशिव),प्रिती शिंदे (धाराशिव),अनुजा लोंढे(धाराशिव),अपेक्षा सापुते (नाशिक) गायत्री इवरकर (वाशिम), अनुराधा मोरे (ठाणे) यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. 

महाराष्ट्र संघा सोबत पूनम कोकाटे मॅनेजर,भावना धूर्वे कोच,नागपूर अनिल मोटे नॅशनल रेफ्री,अखिल भारतीय आट्यापाट्या फेडरेशनचे   जनरल सेक्रेटरी दिपक कवीश्वर,जनरल सेक्रेटरी डॉक्टर अमरकांत चाकोरे सर व विजयी खेळाडूंनवर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून विजयी खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या