🌟अवघ्या 24 तासात मोबाईल चोरटा मुद्देमाल सह केला गजाआड....!


🌟प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांची  पुन्हा दमदार कामगिरी🌟

 शेगाव : या संदर्भात विस्तर वृत्त असे की अमोल दिलीप ढोले वय 35 वर्ष राहणार  हिवरखेड़ तह- तेल्हारा जिला अकोला हे शेगाव येथे दर्शनासाठी आले होते दर्शन झाल्यानंतर थकल्याने ते रेल्वे स्टेशन शेगाव च्या बुकिंग ऑफिस ला झोपले असता कुणी अज्ञात चोरट्याने त्यांचा लावा मोबाईल खिशातून चोरून नेला याची माहिती नेहमीच आपल्या दमदार कामगीरी ने चर्चेत असलेले शेगाव चे  प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांना मिळताच त्यांनी सीसीटीव्ही चेक करून चोरट्याला ओळखले व रात्रभर आपली सूत्र कामाला लावून  सहाय्यक उपनिरीक्षक प्रकाश गावंडे व प्रवीण डहाके यांच्या सोबत शोध घेऊन अवघ्या चोवीस तासात गजानन रमेश गायकवाड वय 24 वर्ष निवासी बुद्ध विहार जवळ  हरिहर पेठ अकोला ला चोरी केलेल्या मोबाईल समवेत पकडले व उपनिरीक्षक डाँ विजय साळवे यांच्या ताब्यात दिले वरून विजय साळवे यांनी कायदेशीर कारवाई करत आरोपीस रेल्वे पोलीस च्या ताब्यात दिले तिथे त्यावर अपराध क्रमांक 0380/2023 कलम 379 भादवी  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अवघ्या चोवीस तासात रंजन तेलंग यांनी केलेल्या या कारवाई चे सर्वत्र कौतूक होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या