🌟जागतिक कौशल्य स्पर्धा-2024 मध्ये नवयुवकांना सहभागी होण्याचे आवाहन......!


🌟महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS), राज्यात राज्य कौशल्य स्पर्धा आयोजित आणि व्यवस्थापित करते🌟

परभणी (दि.13 डिसेंबर) : जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षानी आयोजित केली जाते आणि ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील मुलांसाठी ऑलिम्पिक सारखी स्पधी आहे यापूर्वी, 46 जागतिक कौशल्य स्पर्धेत 62 क्षेत्रातील 50 देशांतील 10,000 उमेदवारांचा समावेश होता. ही स्पर्धा 15 देशांमध्ये 12 आठवडे आयोजित करण्यात आली होती. जागतिक कौशल्य स्पर्धा (WSC) ही जगातील सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा आहे जी WSI सदस्य देशांपैकी एका देशामध् दर दोन वर्षानी एकदा घेतली जाते. या स्पर्धा उच्च कामगिरीसाठी बेंचमार्क आणि व्यावसायिक उत्कृष्टतेचे मूल्यमापन करण्याचा एक वस्तुनिष्ठ मार्ग प्रदान करतात. खालीलप्रमाणे सहा स्किल स्ट्रँड्स अंतर्गत 50 हून अधिक कौशल्यांमध्ये जागतिक दर्जाच्या मानकांना प्रोत्साहन देण्याचे उद्दीष्ट आहे. यामध्ये 1) बांधकाम आणि इमारत तंत्रज्ञान, 2) वाहतूक आणि लॉजिस्टिक, 3) उत्पादन आणि अभियांत्रिकी तंत्रज्ञान, 4) माहिती व संपर्क तंत्रज्ञान, 5) सर्जनशील कला आणि फॅशन आणि 6) सामाजिक आणि वैयक्तिक सेवा या उद्दिष्टांचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS), राज्यात राज्य कौशल्य स्पर्धा आयोजित आणि व्यवस्थापित करते आणि कौशल्य स्पर्धाच्या माध्यमातून तळागाळातील कौशल्यांना महत्वाकांक्षी बनवण्याचा त्यांचा उद्देश आहे. जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 मध्ये फान्स (लिओन) येथे होणार असून जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 च्या नोंदणीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आलेली आहे. यासाठी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या विविध अभ्यासक्रमांमध्ये कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षण संस्थांमधून (यामध्ये सर्व ITI, पॉलिटेक्निक महावि‌द्यालये MSME टूल्स रुम, CIPET, IIT, अभियांत्रिकी महावि‌द्यालय, IHM/हॉस्पिटॅलिटी संस्था, कॉर्पोरेट तांत्रिक संस्था, कौशल्य प्रशिक्षण संस्था व इतर सर्व शाखेची महाविद्यालये, महाराष्ट्र राज्य कौशल्य वि‌द्यापीठ MSBVET, खाजगी कला महाविद्‌यालय, एफ, फ्लॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, इन्स्टिट्यूट ऑफ ज्वेलरी आणि इतर प्रशिक्षण संस्था इत्यादी संस्थेतील प्रशिक्षणार्थीना) जागतिक स्पर्धेत उमेदवारांना सहभागी करून या स्पर्धेची नोंदणी करणे बाबत याद्वारे आपणांस आवाहन करण्यात येत आहे. तसेच या स्पर्धेच्या नोंदणीसाठी NSDC कडून राज्यातील 52 अभ्यासक्रमांमध्ये कौशल्य प्रदान करणाऱ्या प्रशिक्षण संस्थांची माहिती देण्यासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला असून नोंदणीची अंतिम तारीख दि. 20 डिसेंबर, 2023 ही असणार आहे.

त्यानुषंगाने जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 मधील जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेसाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत. जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 साठी वयोमर्यादा हा एकमेव निकष आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी, 2002 रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेला असावा. ॲडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग, क्लाउड कॉम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, डिजिटल कन्स्ट्रक्शन, इंडस्ट्रियल डिझाइन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0, इन्फॉर्मेशन नेटवर्क केबलिंग, मेकॅट्रॉनिक्स, रोबोट सिस्टम इंटिग्रेशन आणि वॉटर टेक्नॉलॉजी या क्षेत्रातील उमेदवारांचा जन्म दि.  1 जानेवारी, 1999 रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेला असावा.

जागतिक कौशल्य स्पर्धा-2024 फ्रान्स (लिओन) मध्ये भाग घेवू इच्छिणारे पात्र उमेदवारांनी वरीलप्रमाणे सहमत असल्यास https://kaushalya.mahaswayam.gov.in किंवा www.skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावरुन आपली नोंदणी करावी. तसेच अधिक माहितीसाठी https://www.msde.gov.in/en/competition-awards/worldskills या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन सहायक आयुक्त प्र.सो. खंदारे यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या