🌟शेगाव रेल्वे स्थानकावर महापरिनिर्वाण दिन 06 डिसेंबर रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना रेल्वेतर्फे अभिवादन....!


🌟भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन 🌟

शेगांव : शेगाव रेल्वे स्टेशन येथे दि. 06 डिसेंबर 20230 रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी शेगांव रेल्वे स्टेशन येथे मध्य रेल्वे शेगांव रेल्वे स्टेशन चे स्टेशन प्रबंधक श्री एम के देशपांडे,परिवहन निरीक्षक श्री प्रकाश पुंडकर, रेल्वे सुरक्षा बलाचे ठाणेदार श्री रणवीर सिंह, आरोग्य निरीक्षक श्रीमती लाभिनी किशोर पाटील,शेगांव येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मायाताई दामोदर यांच्या द्वारे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्गुच्छ अर्पण करून तसेच मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले प्रसंगी रेल्वे सुरक्षा बलाचे पिएसआय डॉ.विजय साळवे यांनी महामानव डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या जीवन व विचार कार्यावर प्रकाश टाकला नंतर सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले अभिवादन  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेगांव स्टेशन चे परिवहन निरीक्षक प्रकाश पुंडकर यांनी केले तर सूत्र संचालन रेल्वे सुरक्षा बलाचे हेड कॉन्स्टेबल रंजन तेलंग यांनी सूत्रसंचालन केले प्रसंगी रेल्वे सुरक्षा बलाचे पिएसआय श्री एस के श्रीवास्तव,एएसआय प्रवीण भरणे,रेल्वे पोलीस नायक श्री कोल्हे,श्री भिका बनकर,आरपीएफ स्टाफ, सफाई कर्मी, स्टेशन स्टॉल वेंडर इत्यादी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या