🌟परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडातील बेपत्ता युवकाची नागपूर येथील एका लॉजवर विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या....!


🌟आयएएस किंवा आयपीएस अधिकारी न झाल्याची खंत व्यक्त करीत शुभमने विष प्राशन करुन केली आत्महत्या🌟

परभणी (दि.२९ नोव्हेंबर) : परभणी जिल्ह्यातील गंगाखेडा येथून दि.२४ नोव्हेंबर २०२३ पासून बेपत्ता असलेल्या शुभम सिध्दार्थ कांबळे या युवकाने नागपूर शहरातील एका लॉजवर विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

 गंगाखेड शहरातील वर्मा नगर भागातील हा युवक मागील पाच दिवसांपासून बेपत्ता होता. कुटूंबियांनी शोधाशोध केली परंतु ठावठिकाणा लागत नसल्याने कुटुंबीयांनी दि.२६ नोव्हेंबर २०२३ रोजी गंगाखेड पोलिस स्थानकात रितसर तक्रार दाखल केली. या दरम्यान नागपूर येथील एका लॉजवर युवकाचा मृतदेह आढळल्याची माहिती कळाल्या पाठोपाठ पोलिसांनी शोध घेतला तेव्हा तो मृतदेह गंगाखेड येथील शुभम कांबळे याचाच असल्याचे निष्पन्न झाले. त्या खोलीतच एक चिठ्ठीही आढळून आली. त्यात ‘आपण आयएएस किंवा आयपीएस अधिकारी न झाल्याची खंत व्यक्त करीत आपण विष प्राशन करुन आत्महत्येचा मार्ग पत्कारत आहोत, असे नमूद केले होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या