🌟पुर्णेतील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात म.जोतिराव फुले यांचा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा.....!


🌟यावेळी प्रा.डॉ रामेश्वर पवार यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले🌟 

पुर्णा (दि.२८ नोव्हेंबर) - येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात आधुनिक भारताच्या सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे जनक महात्मा जोतिराव फुले यांचा स्मृतीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रामेश्वर पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाविद्यालयाच्या वतीने विनम्र अभिवादन केले. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार हे होते.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सांस्कृतिक प्रभारी प्रा.डॉ प्रकाश सूर्यवंशी यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ पी.डी सूर्यवंशी यांनी केले तर आभार क्रीडा संचालक डॉ.भारत चापके यांनी मानले. या कार्यक्रमासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ.भीमराव मानकरे, प्रसिध्दी विभाग प्रमुख प्रा.डॉ.संजय कसाब,  प्रा. डॉ.दीपमाला पाटोदे, प्रा.डॉ.संतोष कुऱ्हे, प्रा.डॉ.अशोक कोलंबीकर, डॉ. विलास काळे, प्रा. डॉ.जितेंद्र देशमुख प्रा.डॉ.मारोती भोसले, प्रा. डॉ.शारदा बंडे, प्रा. जगन्नाथ टोंपे, प्रा. दता पवार,प्रा.वैशाली लोणे ,वरिष्ठ लिपिक सूर्यकांत भोसले, दत्ता कदम,प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या  संख्येने उपस्थित उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या