🌟परभणी जिल्ह्यातल्या पाथरीत कबड्डी स्पर्धांना थाटामाटात सुरुवात....!


🌟डॉ.प्रफुल्ल पाटील यांच्याहस्ते कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन : जोरदार रंगताय सामने🌟


परभणी (दि.30 नोव्हेंबर) :  ग्रामीण मातीतला खेळ म्हणजेच कब्बडी. या खेळातुन जिल्ह्यातील ग्रामिण भागातील खेळाडुंना योग्य असे व्यासपीठ मिळावे तथा त्यांची कब्बडी खेळा विषयीची रुची सदैव वाढत राहावी व यातुन राष्ट्रीय खेळाडु निर्माण व्हावे, या हेतूने भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उद्धवराव नाईक यांच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रफुल्ल पाटील यांच्याहस्ते झाले.

           पाथरी येथील स्व. बुवा साळवी क्रिडा नगरीत आयोजित या कबड्डी स्पर्धांच्या उद्घाटन सोहळ्यास भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष  मुरकुटे यांच्यासह किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रंगनाथ सोळंके, किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवराज नाईक, भाजपाचे पाथरी तालुकाध्यक्ष पांडुरंग नखाते, भाजपा किसान मोर्चा उपजिल्हाध्यक्ष उद्धव श्रावने, भाजपा पाथरी शहराध्यक्ष अमोल बोराटे, भाजपा पाथरी तालुका सरचिटणीस मुंजाभाऊ शिंगारे, भाजपा पाथरी तालुका सचिव नितीन थोरे, विजय नाईक, डॉ. राजेंद्र चौधरी, ज्येष्ठ नेते नानासाहेब वाकणकर, इम्रान पठाण, नानासाहेब देपाळे, दत्ताभाऊ भुमरे, कैलाश घुगे, मोहन कोल्हे, संजय कोल्हे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

दरम्यान, या स्पर्धेला परभणी शहर तथा ग्रामिण भागातून मोठ्या प्रमाणात कबड्डी संघाने सहभाग नोंदवला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या