♦️अपघातग्रस्त कर्‍हाळे कुटुंबाचे आश्रु हे माझे आश्रु - संतोष मुरकुटे


🌟अँटो-बस आपघातात मृत्यू पावलेल्या भरत कर्‍हाळे यांच्या कुटुंबाला संतोष मुरकुटे यांनी दिला आधार🌟 

गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव येथील भरत लक्ष्मण कर्‍हाळे हे अत्यंत मेहनतीने अँटो चालवुन परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होते.. परवा २५ रोजी शनिवारी सांय.७ च्या दरम्यान गंगाखेड-परभणी रोडवर दैठण्या जवळ अँटो-बस आपघाता मध्ये त्यांचा दुर्देवाने मृत्यु झाला घराचा कर्ता माणूस गेल्याने कर्‍हाळे कुटुंबीयांनवर दुखःचा डोंगर कोसळला व कुटुंब उघड्यावर पडले ही बातमी जेंव्हा संतोष मुरकुटे यांना कळाली तेंव्हा आपल्या स्वभावा प्रमाणे माणुसकीला जागत..  कराळे कुटुंबाला सावरण्यात मदत केली.

स्व.भरत लक्ष्मण कर्‍हाळे यांच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुलं आहेत त्यांची मोठी मुलगी मयुरी ही इय्यत्ता ७ वी त शिक्षण घेते तर छोटा मुलगा शिवम हा इय्यत्ता ५ वी त शिक्षण घेत आहेत.

 शिक्षणासाठी शिवम हा अंबाजोगाई येथे हॉस्टेल मध्ये आहे वडीलाच्या निधना नंतर शिवमच्या शिक्षणात अडचण भासु नये शिक्षण थांबु नये यांची काळजी घेत भाऊंनी त्याची पुढील शिक्षणाची जबाबदारी स्विकारत त्याची उर्वरित राहिलेली सध्याची हॉस्टेलची फिस रु.२५,०००/- भाऊंनी देऊ केली तथा स्व.भरत कर्‍हाळे यांच्या दोन्ही लेकरांना दत्तक घेत त्यांचा जिवनातील संपुर्ण शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला व कर्‍हाळे कुंटुंबाला या दुखःतुन सावरण्यासाठी घरचा कर्ता  व्यक्ति गेल्याने परिवारास दुखःतुन सावरण्यासाठी रु. २५,०००/- हाजार रुपयाची अशी मिळुन ५०,०००/- हाजार रुपयांची कर्‍हाळे कुटुंबाला कर्‍हाळे कुटुंबाचा एक सदस्य मानुन संतोषभाऊ मुरकुटे यांनी मदत केली या दुखःद क्षणी कर्‍हाळे कुटुंबासह संतोषभाऊ मुरकुटे यांचे ही आश्रु अनावर झाले होते.

या भावुक घडीला उपस्थीत संतोषभाऊ मुरकुटे,विठ्ठलराव रबदडे मामा,बालाजी मुंढे तथा गौंडगाव ग्रामस्थ..लक्ष्मणराव जाधव,उद्धवराव कर्‍हाळे,दिलीपराव पुकाने,शत्रगुन कर्‍हाळे, अदिनाथ जाधव,सुदामराव कर्‍हाळे,उद्धवराव जाधव,रामभाऊ कर्‍हाळे, ओम कर्‍हाळे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या