🌟पुर्णा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने पुन्हाएकदा हिरावला अन्नदाता शेतकऱ्यांच्या तोंडचा घास....!


🌟अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी🌟                 


पुर्णा (वृत्त विशेष) :- पुर्णा तालुक्यात दि.२७ नोव्हेंबर २०२३ व दि.२८ नोव्हेंबर २०२३ या दोन दिवस सतत पडलेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे पुन्हाएकदा शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेल्याचे हृदयविदारक चित्र संपूर्ण तालुक्यात पाहावयास मिळत आहे तालुक्यातील एरंडएश्वर,चुडावा,कावलगाव,ताडकळस, वजूर सर्कल मधील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले.


पुर्णा गोदावरी नदीकाठावरील कातनेश्वर,फुकटगाव,कान्हेगाव, धानोरा काळे,कानडखेड,कंठेश्वर,येथे दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या मध्यरात्री विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी या मागणीसाठी काल मंगळवार दि.२८ नोव्हेंबर २०२३ रोजी कातनेश्वरसह आडगाव लासीना येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार माधवराव बोथीकर यांना एक लेखी स्वरूपात निवेदन दिले आहे. तालुक्यातील कातनेश्वर व फुकटगावसह अनेक गावांत झालेल्या वादळी वाऱ्यासह शेतात उभे असलेल्या केळी हरभरा कापूस तूर हळद ज्वारी पपई गहू संत्रा डाळिंब पेरू उस भाजीपाला आदी पिके पूर्णत उध्वस्त झाली आहेत कातनेश्वर मंडळात ७६ किलीमीटर इतक्या उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे या अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी चिंताग्रस्त व हवालदिल झाला आहे  अशा अतिबिकट परिस्थितीत  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली त्यावेळी शेतकरी प्रमोद चापके,मेघ शाम चापके,उद्धव चापके भगवान चापके महेश वैद्य माणिक चापके दत्ता चापके शिवाजी चापके शंकर पाटील पालकर शरद चापके रामप्रसाद चापके ओंकार चापके शेषरावजी चापके ओंकार साहब के दीपक चापके यांच्या सह  मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या