🌟राज्यातील काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान....!


🌟९९ हजार ३८१ हेक्टर बाधित क्षेत्रातील पंचनामे प्रचलित कार्यपद्धती प्रमाणे तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश🌟

राज्यातील काही जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसात प्रचंड प्रमाणात अवकाळी पाऊस गारपीट झाली त्यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आजपर्यंत प्राप्त प्राथमिक अंदाजे माहितीनुसार ९९ हजार ३८१ हेक्टर बाधित क्षेत्रातील पंचनामे प्रचलित कार्यपद्धती प्रमाणे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी प्रशासनाला जारी केले असून ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठविण्याचे देखील निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या