🌟परभणी तालुक्यातील आमडापूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्स कारखान्याची एफआरपी थकीत नाही....!


🌟उस उत्पादकांनी हंगाम २०२३-२४ साठी जास्तीतजास्त उस गाळपासाठी देऊन सहकार्य करा - कारखाना प्रशासन

परभणी (दि.०२ नोव्हेंबर) - परभणी तालुक्यातील आमडापूर पो.सिंगणापूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्स या साखर कारखान्याने गत ३०२२-२३ या वर्षा साठी एफआरपी दर प्रती मे टन २२९५.६३ रुपये इतका असून त्यामध्ये कारखान्याने पहिला हप्ता रुपये २२००/- प्रमाणे व दुसरा हप्ता रुपये १००/-असे २३००/-प्रती मेट्रिक टन प्रमाणे दर अदा केलेला आहे त्यामुळे कारखान्याकडे कुठल्याही प्रकारची एफआरपी प्रमाणे देय रक्कम राहीलेली नाही या बाबत आयुक्त (साखर) साखर संकुल पुणे यांच्या रिपोर्ट नुसार कारखान्याकडे कुठल्याही प्रकारची एफआरपी प्रमाणे रक्कम थकीत नसून श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्स कारखान्याने १०० टक्के एफआरपी रक्कम अदा केलेली आहे.


तसेच चालू गाळप हंगामाकरीता कारखाना व्यवस्थापणाने प्रथम उचल म्हणून रुपये २५०० जाहीर केलेली असून उर्वरित शासनाचे धोरणाप्रमाणे येणाऱ्या एफआरपी दरानुसार रक्कम अदा करण्यास कारखाना बांधील राहील तरीही काही लोकांकडून कारखान्याची जाणीवपूर्वक मोबाईल वरील वाट्सऍपद्वारे बदणामी करण्याचे काम सुरू असल्याचे कारखाना प्रशासनाचे म्हणणे आहे उस उत्पादक शेतकऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नयें अथवा भुलथापांना बळी न पडता कारखाना परिसरातील उस उत्पादकांनी हंगाम २०२३-२४ साठी जास्तीतजास्त उस गाळपासाठी देऊन सहकार्य करण्याचे आवाहन कारखाना व्यवस्थापणाच्या वतीने करण्यात आले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या