🌟परभणी तालुक्यात नव मतदारांच्या नोंदणीसाठी शिबीर संपन्न.....!

 


🌟यावेळी स्वीप टीमचे यज्ञेश्वर लिंबेकर आणि शिवाजी कांबळे यांनी मतदार जनजागृती पर गीत सादर केले🌟


परभणी (दि.29 नोव्हेंबर) : भारत निवडणूक आयोगाने दि. 01 जानेवारी, 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार नव मतदारांनी  दि. 27 ऑक्टोबर, 2023 ते दि. 9 डिसेंबर, 2023 या कालावधीत मोठ्या प्रमाणावर नाव नोंदणी करून घेण्यासाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. तसेच नवमतदारांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व महिला मतदारांनी राज्य घटनेने दिलेल मतदानाचा हक्क बजावुन मतदानाची टक्केवारी वाढविणे आवश्यक आहे असे निर्देश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने परभणी तालुक्यात दि. 29 नोव्हेंबर, 2023 रोजी ज्ञानसाधना फार्मसी महाविद्यालय, धर्मापुरी व तहसील कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने नव मतदार नोंदणी व मतदार जनजागृती शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

सदर कार्यक्रमाचे अनुषंगाने मतदार नोंदणी व मतदान जनजागृतीबाबत सर्व पात्र विद्यार्थ्यांनी व महिला व नव मतदारांनी सशक्त लोकशाही घडविण्यासाठी त्यांनी त्यांची नावे मतदार यादी मध्ये नोंदविणे आवश्यक आहे. महिला मतदारांनी आपले नाव मतदार यादी मध्ये नोंदवून मोठ्या प्रमाणावर मतदान करणेबाबत तसेच सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याबाबत मार्गदर्शन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांचे वतीने नायब तहसीलदार लक्ष्मीकांत खळीकर यांनी तसेच संस्थापक अध्यक्ष किरण सोनटक्के यांनी केले.

दि. 27 ऑक्टोबर, 2023 ते दि. 9 डिसेंबर, 2023 या कालावधी नव मतदारांनी त्यांचे नाव मतदार यादीमध्ये नोंदविण्यासाठी नमुना नंबर-6, नावात दुरुस्तीसाठी नमुना नंबर-8, मयत अथवा कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणी करण्यासाठी नमुना नंबर-7 अर्ज मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत अथवा वोटर हेल्पलाइन ॲपचे माध्यमातून भराव्यात. या शिबीरात नव मतदारांना/महिलांना सदरील फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्राची माहिती देण्यात आली. यावेळी स्वीप टीमचे यज्ञेश्वर लिंबेकर आणि शिवाजी कांबळे यांनी मतदार जनजागृती पर गीत सादर केले...... 

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या