🌟जालना-छपरा-जालना विशेष गाडी लाईन ब्लॉकमुळे काही दिवस रद्द.....!


🌟उत्तर मध्य रेल्वेने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली घोषणा🌟 

परभणी (दि.२९ नोव्हेंबर) : महाराष्ट्र व बिहार राज्याला जोडणारी जालना-छपरा-जालना विशेष गाडी लाईन ब्लॉक मुळे काही दिवसांसाठी तात्पुरती रद्द करण्यात आली असल्याची घोषणा उत्तर मध्य रेल्वेने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

जालना ते छपरा गाडी क्रमांक ०७६५१ ही साप्ताहिक विशेष गाडी आज बुधवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२३ ते ०३ जानेवारी २०२४ दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर गाडी क्रमांक ०७६५२ छपरा ते जालना साप्ताहिक विशेष गाडी दिनांक ०१ डिसेंबर २०२३ ते ०५ जानेवारी २०२४ दरम्यान रद्द करण्यात आली आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या