🌟राजीव दीक्षित जयंती आणि स्मृतिदिन विशेष : उच्च पगाराची नोकरी ठोकरून जीवन स्वदेशीसाठी.....!


🌟राजीव दीक्षित यांनी संपूर्ण भारतीय इतिहासाचा अभ्यास केला ते स्वदेशी जागरणकर्ता होते🌟

         राजीवजी दीक्षित हे एक भारतीय समाज सुधारक होते. त्यांनी स्वदेशी चळवळ बळकट केली, आपल्या अनेक व्याखानांतून त्यांनी स्वदेशी उत्पादनांंबद्दल जनमानसांत प्रचार केला व लोकांना स्वदेशी वापराचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्‍न केला. ते भारतीय स्वाभिमान आंदोलनचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. राजीव भाई दिक्षित एक क्रांतिकारी होते. त्यांनी संपूर्ण भारतीय इतिहासाचा अभ्यास केला ते स्वदेशी जागरणकर्ता होते.

         राजीव दीक्षित यांचा जन्म दि. ३० नोव्हेंबर १९६७ रोजी उत्तर प्रदेशातील, अलिगढ जिल्ह्यातील नाहगावात झाला. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण फिरोजाबाद जिल्ह्यात झाले. त्यांनी एमटेकची पदवी आयआयटी कानपूरमधून प्राप्त केली आणि डॉक्टरेट फ्रान्समधून घेतली. ते अविवाहित होते. त्यांनी सुरुवातीचे काही दिवस सीएसआयआर आणि फ्रांस टेलिकम्युनिकेशन मध्ये नोकरी सुद्धा केली. एका प्रोजेक्टवर काम करत असताना ते एपीजे.अब्दुल कलाम यांच्या संपर्कात देखील आले होते. स्वदेशी वस्तूंच्या वापरासाठी ते आजीवन झटले, त्यांनी अनेक विदेशी कंपन्यांची पोलखोल केली. तसेच भारताबाहेरील स्वीज बँकेतील भारताचा काळा पैसा भारतात परत अणण्याबाबत आग्रही राहिले. सन २००० ते २००९ या नऊ वर्षात स्वदेशी ओवर विदेशी या हॅशटॅगमुळे ते खूप लोकप्रिय झाले होते. भारत कृषी प्रधान देश असल्याने त्यांनी शेतीला प्राधान्य देऊन ही चळवळ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रासायनिक खतांच्या ऐवजी स्वदेशी खते म्हणजेच गांडूळ खत, शेण खत ही खते शेतीसाठी वापरण्याचा आग्रह धरला. ते आजीवन स्वदेशी वस्तू वापरण्यासाठी आग्रही राहिले, त्यांनी त्यासाठी भारत स्वाभिमान आंदोलन आणि आजादी बचाओ सारखी आंदोलने उभारली. उच्च पगाराची नोकरी सोडून त्यांनी आपले आयुष्य स्वदेशासाठी व्यतीत केले. स्वदेशीचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या ध्वनिफितींमुळे ते प्रसिद्ध झाले. त्यांनी व्याख्याने ध्वनिमुद्रित करून ती नंतर लोकांना उपलब्ध होतील याची परिपूर्ण काळजी घेतली होती. भारताचा काळा पैसा विदेशी बँकामध्ये अनधिकृतरीत्या कसा फिरतो आहे, हे पण त्यांनी उघड करून दाखवले. भारतीयांनी गैर मार्गाने मिळवून स्विस बँकांमध्ये जमा केलेल्या सर्व काळ्या पैशाची माहिती उघड व्हावी, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. स्वदेशीचा प्रचार गावोगावी जाऊन केला. जास्तीत जास्त लोकांनी स्वदेशी वस्तू वापरल्या तर देशात रोजगार निर्माण होईल व देशातला पैसा देशातच फिरत राहील हे तत्त्व त्यांनी लोकांसमोर मांडले. ते २० वर्ष व्याख्यान देत देशभर फिरले.

       राजीवभाई आणि योग गुरू रामदेवजी यांची भेट सन २००९मध्ये झाली. खूप कमी वेळपर्यंत त्यांची ती घनिष्ठ मैत्री टिकली. राजीवभाई आणि योग गुरू रामदेवजी यांचे विचार सारखे होते. आयुर्वेद आणि काळा पैसा याबाबीत त्यांची मते एक होती. नोव्हेंबर २००९मध्ये योग गुरू बाबा रामदेवजी यांनी राजीव दीक्षित यांची भारत स्वाभिमानी ट्रस्टचे प्रमुख वक्ता व राष्ट्रीय सचिव म्हणून नेमणूक केली होती. ही जवळीक बाबा रामदेव यांच्या निकटवर्तीय लोकांना खुपत होती, असे सुद्धा त्या काळात दबक्या आवाजात बोलले जात होते. पुढे ही मैत्री फार काळ टिकू शकली नाही.

       भिलाईमध्ये व्याख्यानासाठी दौऱ्यावर असताना दि.३० नोव्हेंबर २०१० रोजी त्यांचे अचानक निधन झाले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला, असे प्राथमिकरित्या समजण्यात आले होते, परंतु अजूनही त्यांच्या मृत्यूचे खरे कारण अज्ञात आहे. 

        राजीवभाई यांच्या समर्थकांनी पोस्ट मॉर्टम करून मृत्यूचे नेमके कारण कळावे, अशी मागणी केली होती. पण बाबा रामदेव यांनी ही परवानगी दिली नाही. राजीव दीक्षित यांचे जवळचे मित्र मदन दुबे हे योग गुरू बाबा रामदेवजी यांना भेटले होते. पण त्यांना बाबा रामदेवजी यांना अंतिम संस्कार लवकर व्हावेत यासाठी कमालीची घाई झालेली दिसून आली होती. मदन दुबे यांच्या मते, राजीव दीक्षित यांच्याबद्दल अंतर्गत लोकांची असलेली मतभिन्नता, जळफळाट हेच राजीव दीक्षित यांच्या मृत्यूचे खरे कारण आहे. मदन दुबे यांना असे वाटण्याचे अजून हे एक कारण होते की, ज्या हॉलमध्ये राजीव दीक्षित यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते; तेथे योग गुरू रामदेवजी आले आणि त्यांनी हे वाक्य वापरले, “पोस्ट मॉर्टम हे हिंदू धर्माच्या विरुद्ध आहे, अंतिम संस्कार लगेच झाले पाहिजे.” ते भगव्या रंगात असतात, पण त्यांचा प्रमुख भर हा योग शिकवण्याकडे असतो. पण त्यावेळी रामदेव बाबांनी अशी धार्मिक बाब सांगितली की, जमलेल्या लोकांनी लगेच त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. प्रदीप दीक्षित व मदन दुबे यांची मागणी त्यामुळे पुर्णपणे दुर्लक्षित झाली. राजीवभाई दीक्षित यांचा मृत्यू नैसर्गिक की घातपात हे कायमसाठी रहाणारे एक गूढ आहे, शवविच्छेदनाला झालेला विरोध, घाईत केलेले अंतिम संस्कार आणि ऐन वेळी प्रदीप दीक्षित यांनी पाळलेले मौन ही यामागची प्रमुख कारणे सांगितली जातात. राजीव दीक्षित यांच्या मृत्यूने त्यांची स्वप्ने अपूर्ण राहिली. राजीव दीक्षित आणि बाबा रामदेवजी हे मिळून सन २०१४मध्ये एक राजकीय पक्ष स्थापन करणार होते, ज्यामध्ये केवळ प्रामाणिक लोक असतील.

       “भारत जगात शक्तिशाली देश असेल आणि स्वदेशी आंदोलन देशातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल.” अशी त्यांची स्वप्ने होती, पण वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि ती स्वप्ने अपूर्णच राहिली. त्यांच्या मृत्यूनंतर भारत स्वाभिमानी ट्रस्टचे रूपांतर योग गुरू रामदेवबाबांनी पुढे जाऊन पतंजली केले आणि या पतंजलीमध्ये  देशसेवेची ती उर्मी आता राहिली नाही. पतंजली आता एक व्यापारी ब्रँड झाला आहे.      

!! राजीवभाई दीक्षित यांना त्यांच्या जयंती व स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !!

    - संकलन  -

                        श्री एन.कृष्णकुमार जी.गुरूजी.

                        गडचिरोली, फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.

                             

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या