🌟पाथरी येथे कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा आत्मा योजने अंतर्गत जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न.....!


🌟कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सुरेश माने यांनी मुद्देसूद ऊस लागवड तंत्रज्ञान विषयी सविस्तर माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली🌟


परभणी/पाथरी (दि.30 नोव्हेंबर) - परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे आज दि.30 नोव्हेंबर 2023 रोजी कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा आत्मा योजनेअंतर्गत जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला आधुनिक ऊस लागवड तंत्रज्ञान.या विषयावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष  दौलत चव्हाण प्रकल्प संचालक आत्मा परभणी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  रवि हरणे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी, प्रमुख मार्गदर्शक.सुरेश माने वरिष्ठ वरिष्ठ शास्त्रज्ञ (माजी ) वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे,डॉ.अमोल काकडे सर कीटक शास्त्रज्ञ के व्ही के परभणी,दादासाहेब टेगंसे माजी जि.प.सदस्य,सदाशिव थोरात माजी सभापती प.स.पाथरी यांच्या उपस्थितीत जागृत हनुमान मंदिर शिक्षक कॉलनी पाथरी येथे पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सुरेश माने यांनी  मुद्देसूद ऊस लागवड तंत्रज्ञान विषयी सविस्तर माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली.यात दर्जेदार बियाणे निवड,आधुनिक लागवड पद्धत,खते आणि पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञान, तन व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, रानडूकरांपासुन ऊस पिकांचे संरक्षण,तसेच उच्च उत्पन्न घेण्याचे बारकावे या बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी पाथरी तालुक्यातील शेतकरी यांनी चांगला प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  .आबासाहेब देशमुख तालुका कृषी अधिकारी पालम यांनी केले तर आभार गोविंद कोल्हे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी  आदी शेतकऱ्याची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या