🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील पंचशील बुध्द विहारात बुद्ध प्रतिष्ठापना....!


🌟पंचशील बुध्द विहारास उपा.सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांनी तथागत गौतम बुद्ध यांची मुर्ती दान दिली आहे🌟

पुर्णा (दि.२८ नोव्हेंबर) - पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरातील पंचशील बुध्द विहारास उपा. सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांनी तथागत गौतम बुद्ध यांची मुर्ती दान दिली आहे. या बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना सोमवार २७ नोव्हेंबर रोजी कार्तिकी पौर्णिमेच्या दिनी करण्यात आली.

ताडकळस येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरातील पंचशील बुध्द विहारास नुकतीच उपा. सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांनी तीन फुट उंचीची तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मुर्ती दान दिली आहे. या बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना पौर्णिमेच्या दिवशी करण्यात आली. यावेळी हातात मेणबत्ती व पुष्पवृष्टी करीत बुध्दम शरणंम गच्छमी गजरात बुद्ध मुर्तीची शांतता मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक कपील शेळके, माजी सैनिक केशवराव डहाळे, ग्राम पंचायत सदस्य बबलू माने, सौ . छाया सुरेश मगरे,संजय जल्हारे, गजानन खंदारे, नारायण तिगोटे , प्रदीप गायकवाड आदींची उपस्थिती होती. यावेळी उपा.डि. आर. मगरे, पत्रकार सुरेश मगरे, रवि डहाळे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच उपा. प्रतिभाताई शिवाजी डहाळे यांच्याकडून खिरदान देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन मगरे, कैलास मगरे, शुभम डहाळे,राजु मगरे, स्वप्नील सानके, दिपक मगरे, सुरेश गायकवाड, भानुदास मगरे, रितेश मगरे, चंद्रकांत मगरे, बालासाहेब मगरे,ऋषिकेश तिगोटे,तुकाराम डहाळे, बालासाहेब सानके यांच्यासह रमाई महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या