🌟जंग-ए-अजिन्युज महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या.....!


🌟उद्धव ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकल्याने आता खालच्या पातळीवरील भाषा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

* शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या मंत्रालयाला घेराव आंदोलनपुढे अखेर सरकार नरमले,बहुतांश मागण्या मान्य 

* ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना अटक, भरसभेत मुख्यामंत्र्यांना शिवीगाळ करणं भोवलं

* उद्धव ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकल्याने आता खालच्या पातळीवरील भाषा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

* प्रकाश आंबेडकर यांनी टिपू सुलतानच्या फोटोला घातला हार, पोलिस खात्याला दिले खुले आवाहन.

* मराठा आरक्षणाचा मुद्दा हा अंतर्गत असून निजाम मराठा विरुद्ध रयत मराठा असा हा संघर्ष सुरू - प्रकाश आंबेडकर

* विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शेतकऱ्यांच्या बांधावर

* राहुल द्रविड पुन्हा एकदा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदी, बीसीसीआयने वाढवला कार्यकाळ

* शिवसेना उबाठा गटाचे दत्ता दळवी यांची गाडी फोडली

* मिरजमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी मिरासाहेब दर्गा येथे  भेट देऊन गलेप अर्पण केला

* जे राजकीय फायद्यासाठी लढतात त्यांच्यावर कोण फुलं उधळणार?- मनोज जरांगे पाटील यांचा भुजबळांवर घनाघात आरोप*

* लोकशाहीत बहुमताचा आदर करावा, अजित पवारांचा शरद पवारांना टोला

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून शपथ घेतली आहे त्यामुळे त्यांना मराठा आरक्षणासाठी वेळ देऊया - पृथ्वीराज चव्हाण

* मिरजमध्ये डेंग्यू आजाराने भाजप सांगली जिल्हा वाहतूक सेना उपाध्यक्षचा बळी

* पुणे म्हाडाच्या घरांच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला! येत्या 05 डिसेंबर 2023 रोजी संगणकीय सोडतीत विजेत्यांची नावं घोषित केली जाणार

* ISRO लवकरच भारतीय अंतराळवीर अंतराळात तिरंगा फडकावणार आहे. 2024 मध्ये भारतीय अंतराळवीर स्पेस स्टेशनवर (ISS) पाठवण्याची तयारी सुरु

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या 51,000 हून अधिक लोकांना सरकारी नोकऱ्यांच्या नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात येणार

* मालवणमध्ये चार डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या नौदल दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार

* अल्पसंख्याक विभागाला 500 कोटींचा निधी; जमात-ए-उलेमा हिंद संघटनेने मानले उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आभार

* लगान' फेम सिनेमॅटोग्राफर गुरुराज जोइस यांचे निधन; वयाच्या 53व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

* गौतम सिंघानिया यांच्या अडचणीत वाढ; प्रॉक्सी फर्मने आरोपांची चौकशी करण्याची केली मागणी

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या