🌟रिपब्लिकन वार्ता आयोजित वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पुर्णेतील मान्यवरांच्या कार्याचा यथोचित सन्मान.....!


🌟यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे करण्यात आले होते 'रिपब्लिकन वार्ताच्या' तृतीय वर्धापन दिनाचे आयोजन🌟


यवतमाळ/पुसद : नाशिक येथील रिपब्लिकन वार्ता व रिपब्लिकन वृत्तवाहिनीच्या तृतीय वर्धापन दिनाचे औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील व्यापारी भवन वासमवी माता चौक परिसरातील सभागृहात दि.२६ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ०४-०० वाजेच्या सुमारास रिपब्लिकन वार्ता समुहाचे मुख्य संपादक डॉ.अनिलजी आठवले यांच्या प्रमुख मार्गदर्शनखाली तसेच कार्यकारी संपादक सलीम सय्यद यांच्या नेतृत्वाखाली व सिनियर एडिटर युवराज हंगेकर, कार्यालयीन व्यवस्थापक अनिल कळंके,छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी अकबर शहा,गंगाखेड प्रतिनिधी राजकुमार मुंडे,देवणी लातूर प्रतिनिधी समीर मोमीन,भोकरदन जालना प्रतिनिधी मजहर पठाण,परभणी/पुर्णा प्रतिनिधी सलीम सैय्यद सुहागणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भ उपसंपादक राजेश ढोले,केळापूर तालुका प्रतिनिधी हनुमंत लसंते,पुसद तालुका प्रतिनिधी कैलास श्रावणी यांनी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत तृतीय वर्धापन दिनाचे आयोजन केले होते.


यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल अनेक मान्यवरांच्या सन्मानाचे आयोजन केले होते ज्यात प्रशासकीय सेवेतील अधिकारी तसेच सेवानिवृत्त अधिकारी, कृषी क्षेत्रातील प्रगतशील शेतकरी,सामाजिक क्षेत्रातील समाजसेवक,व्यापार/उद्योग क्षेत्रातील मान्यवर तसेच पत्रकार क्षेत्रातील जेष्ठ जनहितवादी पत्रकारांचा देखील यात समावेश होता.यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे आयोजित रिपब्लिकन वार्ता व रिपब्लिकन वृत्तवाहिनीच्या तृतीय वर्धापन दिनाच्या भव्य कार्यक्रमात सन्माननीय संपादक डॉ.अनिलजी आठवले व सन्माननीय आयोजकांनी परभणी जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहा ते सात जनांचा यावेळी सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन यथोचित गौरव केला यात व्यापार क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व तथा शेतकऱ्यांचे हितचिंतक पुर्णा तालुका व्यापारी महासंघाचे नुतन तालुकाध्यक्ष तथा आवडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.जयप्रकाशजी बद्रीनारायन मोदानी यांना 'समाजरत्न' तर  परभणी जिल्हा परिषद प्रशासकीय सेवेत यशस्वी कारकीर्द गाजवून सेवानिवृत्त झालेले केंद्र प्रमुख तथा जेष्ठ समाजसेवक श्री सय्यद मुनसब सय्यद अमीर सुहागण तालुका पुर्णा जिल्हा परभणी यांना शिक्षणरत्न तर पुर्णा पोलीस स्थानकाचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रदीपजी काकडे यांना देखील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कर्तव्यदक्ष/कर्तव्यतत्पर अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले तर कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तुकाराम लोखंडे यांना प्रगतशील शेतकरी म्हणून तर पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जंग-ए-अजितन्युज वेबवृत्त वाहिनीचे संपादक/संचालक तथा शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष चौधरी दिनेश यांना समाजरत्न म्हणून तर 'देणं समाजाच' या लोकहितवादी समुहा अंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाला प्राधान्य देऊन पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल या समुहाचे प्रमुख डॉ.गुलाबराव इंगोले यांना देखील सन्मानित करण्यात आले तर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉ.प्रा.व्यंकटेश काळे एरंडएश्वर तालुका पुर्णा यांना देखील सन्मानित करण्यात आले तर रिपब्लिकन वार्ता व रिपब्लिकन वृत्तवाहिनी समुहात कौतुकास्पद कामगिरी बजावल्याबद्दल सय्यद सलीम सुहागणकर यांना देखील सन्मानित करण्यात आले तर दैनिक एकमतचे पत्रकार सुशिल शिवाजीराव गायकवाड यांना देखील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.


यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे आयोजित रिपब्लिकन वार्ता व रिपब्लिकन वृत्तवाहिनीच्या तृतीय वर्धापन दिनाच्या भव्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावेळी भिमराव कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून पुर्णा तालुका व्यापारी महासंघाचे नुतन तालुकाध्यक्ष तथा आवडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.जयप्रकाशजी बद्रीनारायन मोदानी हे होते.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या