🌟गंगाखेड ओबीसी समितीची हिंगोली मेळावा तयारी जोरात....!

 


🌟मराठा बांधवांशीही संवाद साधण्याचा निर्णय🌟 

गंगाखेड : येत्या २६ तारखेला सकल ओबीसी समाजाचा हिंगोली येथे मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी गंगाखेड तालुक्यातून २०० वाहनांद्वारे जाण्याचा निर्धार आज झालेल्या सकल ओबीसी समाज बैठकीत करण्यात आला. यासाठी गंगाखेड तालुका ओबीसी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली असून या समिती मार्फत ओबीसींबरोंबरच स्थानिक पातळीवरील मराठा आंदोलकांशीही सुसंवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

गंगाखेडच्या शासकीय विश्राम गृहात संपन्न झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते विठ्ठलराव रबदाडे मामा हे होते. ओबीसीतील विविध जातींचे प्रतिनिधी हजर होते. मराठा बांधवांना आरक्षण मिळालेच पाहिजे पण ते देत असताना ओबींसींच्या आरक्षणास धक्का लावू नये, अशी आग्रही मागणी यावेळी विविध पदाधिकाऱ्यांनी केली. याच मागणीसाठी हिंगोलीत होत असलेल्या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने ऊपस्थित राहण्याचा निर्धार करण्यात आला. 

काही ठिकाणी मराठा आणि ओबीसी बांधवांमध्ये वादाच्या घटना घडत आहेत. तसेच एकमेकांविषयी गैरसमज पसरले जात आहेत. यामुळे गावपातळीवरील वातावरण दुषीत होत आहे. हे थांबवण्यासाठी स्थानिक पातळीवर मराठा-ओबीसी समन्वय साधण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी संयुक्तपणे सरकारकडे लावून धरण्याचा ठराव करण्यात आला. 

तालुका स्तरीय समन्वय समितीत सर्वश्री रामप्रभू मुंडे, गोविंद यादव, गोविंद मानवतकर, जुनैद कुरैशी, साधनाताई राठोड, बालासाहेब पारवे, रामेश्वर भोळे, नागनाथ कासले, दयानंद कुदमुळे आदिंचा समावेश आहे. आज झालेल्या बैठकीस सर्वश्री शंकरराव वाघमारे, बालासाहेब मुंडे, ॲड. व्यंकटराव तांदळे, अभय कुंडगीर, धोंडीराम जाधव, श्रीराम मुंडे, ब्रिजेश गोरे, वैजनाथ शेटे, सुनिल मेहत्रे, मनोहर महाराज केंद्रे, विलास गाढवे, जयदेव मिसे, सचीन दहीवाळ, रमेश डहाळे, आप्पाराव शिंदे, जीतेश गोरे, अमोल जाधव, आदिंसह विविध जाती प्रतिनिधींची ऊपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या