🌟पुर्णा तालुक्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने केले शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान....!


🌟तालुक्यात शेतकरी हवालदिल शेतमजूरांचे हाल उसतोड कामगारांवर उपासमारीची वेळ🌟 


पुर्णा (दि.२९ नोव्हेंबर) - पुर्णा तालुक्यात दि.२७/२८ नोव्हेंबर २०२३ रोजी विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांसह बागायती पिक व भाजीपाल्याचे देखील अतोनात नुकसान झालेले दिसून येत आहे

तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू,ज्वारी,हरभरा,मका, कापूस,भाजीपाला,संत्रा,पेरु डाळिंब अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात पडझड तर झालीच शेतशिवारातील मोठमोठी झाड देखील कोलमडून पडली त्यामुळे शेतकऱ्यांच्नुया तोंडचा घास पुन्हा एकदा निसर्गाने पळवल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाल्याचे दिसत असून शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतमजूर तसेच उसतोड कामगारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे.


अतिवृष्टीने झालेल्या प्रचंड नुकसानी संदर्भात मरसूळ येथील शेतकऱ्यांनी पुर्णा तहसिलचे तहसिलदार माधवराव बोथीकर यांच्या मार्फत परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना लेखी स्वरूपात निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली असुन सदरील निवेदन प्रगतशील शेतकरी गणपत देवराव शिंदे व बाळु शिंदे. उत्तमराव कदम यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांनी निवेदन प्रशासनाला दिले असून निवेदनाद्वारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ करण्यात यावी व पुन्हा पेरणीसाठी सहकार्य करावे अशी मागणी मरसूळ येथील ग्रामस्थांनी केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या