🌟जालना येथे मराठा आरक्षणाचे अभ्यासक जलदूत राजेंद्र दाते पाटील यांचा संजय लाखे पाटील मित्र मंडळ यांच्याकडून सत्कार..!


🌟याच व्यासपीठावर कुणबी सेनेच्या वतीने कुणबी भूषण मराठवाडा भूषण जलदूत राजेंद्र दाते पाटील यांचा सत्कार 🌟


जालना : मराठवाड्यातील जनतेसाठी पाणी प्रश्नावर सतत जन आंदोलन करणारे तसेच शासनाच्या विरोधात न्यायालयात पाण्यासाठी जनहित याचिका करणारे डॉक्टर संजय लाखे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून मराठवाड्याच्या जनतेच्या हितासाठी लढणारे जलदूत तसेच मराठा आरक्षणाचे गाढेअभ्यासक कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते मराठा समाजाला कुणबीचे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा दृढनिचेय करून संपूर्ण मराठवाडा व महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी  झटणारे राजेंद्र दाते पाटील यांचा तसेच मराठवाड्यातील जनतेसाठी पाण्याच्या प्रश्नावर तसेच विविध प्रश्नावर लढणारे छावा संघटनेचे प्राध्यापक चंद्रकांत भराट छावा श्रमिक संघटनेचे शैलेश भिसे, गणेश थोरात विजय घोगरे रेखाताई वाघळे संदीप शेळके सुरेश वाहुळे राजेश मिटकर सुकन्या भोसले नितीन अजमेरा यांचा संयोजन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

आज मराठवाडा विकास समिती अध्यक्ष राजकीय अभ्यासक डॉ. संजय लाखे पाटील मित्र मंडळ तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राजेंद्र दाते पाटील व प्रमुख मान्यवरांचायांचा शाल श्रीफळ पुष्पहारणे जंगी सत्कार करण्यात आला याच दरम्यान पत्रकार विष्णू कदम यांची कुणबी सेनेच्या मराठवाडा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल छावा संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक चंद्रकांत भराट यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा पांजरपोळ येथे आज हा सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर लागडणारे जलतज्ञ काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत  मा नगरसेवक विष्णू पाचफुले  मा कारखाना संचालक माऊली कदम सुभाषराव कोळकर शरदराव देशमुख, अशोकराव उबाळे, मराठा महासंघाचे अशोक पडूळ छावा संघटनेचे प्रमुख मा पंचायत समिती सदस्य गणेश गुजर शुभम टेकाळे  एडवोकेट राऊत  संघटनेचे छत्रपती संभाजी नगरचे प्रमुख पदाधिकारी  तसेच संपादक भरत मानकर पत्रकार संपादक कैलास फुलारी

लाखे सर संजय देशमुख गोरे सर आदी मान्यवर उपस्थित होते याच व्यासपीठावर कुणबी सेनेच्या वतीने कुणबी भूषण मराठवाडा भूषण जलदूत तथा मराठा आरक्षणाचे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांचा सत्कार विष्णू कदम यांनी केला याप्रसंगी संपादक कैलास फुलारी शरद देशमुख अशोक उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या