🌟बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहराला घेरले धुक्याने : पादचाऱ्यांसह वाहन चालकही त्रस्त.....!


🌟चिखलीकरांना काश्मीर,सिमला,कुलुमनाली, दिल्ली,महाबळेश्वर, लोणावळा येथे असल्याचा भास🌟

बुलढाणा: जिल्ह्यातील चिखलीत काल मंगळवार दि.२८ नोव्हेंबर २०२३ रोजी संध्याकाळपासून संपूर्ण शहर धुक्केमय  झाले होते त्यामुळे संपूर्ण चिखलीतील वातावरण धुक्याने वेढलेले दिसत होते. चिखलीकरांनी अनेक वर्षात पहाटे पहाटे धुक्ये पडल्याचे अनेक वेळा पाहिले आहे मात्र काल शेकडो वर्षात चिखली शहरात प्रथमच संध्याकाळच्या वेळेस धुके पडल्याचे पाहिले आहे. 


चिखली शहरातील नागरिकांनी आयुष्यात प्रथमच संध्याकाळच्या वेळेस धुक्ये पडल्याचे पाहिले आहे.चिखली शहरात एवढे धुक्ये पसरले आहे की धुक्यामुळे  अवघ्या दहा पंधरा फुटापर्यंतचे समोरचे पण नागरिकांना लोकांना दिसत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. संपूर्ण चिखली शहरात धुक्याचे वातावरण सर्व  चिखलीकर काश्मीर ,कुलू मनाली, सिमला, दिल्ली ,महाबळेश्वर  लोणावळा  येथे असल्याचा आनंद  घेत आहे . संपूर्ण चिखली शहरातील युवक, युवती, संपूर्ण युवा पिढी, विविध वयोगटातील नागरिक, स्त्रिया घराबाहेर बाहेर पडून या धुक्यामुळे चिखली शहरात निर्माण झालेल्या वातावरणाचा आनंद घेत असल्याचे व आपल्या मोबाईल मध्ये या धुक्याचे फोटो, व्हिडिओ काढून आनंद घेत असल्याचे चिखली शहरातील संपूर्ण भागात, गल्ली गल्लीत शहरातील मुख्य रोडवर दिसून येत आहे . चिखली शहरातील युवक नागरिकांसह ज्येष्ठ नागरिक देखील आपण चिखलीमध्ये आयुष्यात प्रथमच असे धुक्के पाहत असल्याचे म्हणताना दिसत आहे. थोड्या थोड्या वेळाने म्हणजे पंधरा वीस  मिनिटांनी हे धुक्के वाढताना चित्र चिखली दिसून येत असुन या धुक्यामुळे मात्र दुचाकी व चारचाकी चालवणाऱ्या  वाहनधारकांची तारांबळ उडत असल्याचे चित्र संपुर्ण चिखली शहरात दिसून येत आहे....... 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या