🌟परभणी जिल्ह्यातील गोशाळा,पांजरपोळ,गोक्षेत्र संस्थाना नोंदणी करण्याचे आवाहन.....!


🌟महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या https://mhgosevaayog.org/form_goshala3/ संकेतस्थळावर दि. 31 डिसेंबर पर्यंत करा नोंदणी🌟

परभणी (दि.22 नोव्हेंबर) : जिल्ह्यातील गोशाळा, पांजरपोळ, गोक्षेत्र यांनी महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या https://mhgosevaayog.org/form_goshala3/ संकेतस्थळावर दि. 31 डिसेंबर, 2023 पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त श्री. नेमाडे यांनी केले आहे. नोंदणीसाठी बँक पासबूक, मागील तीन वर्षाचे लेखा परीक्षण, वर्षभरातील उपक्रमांची पेपर मधील प्रमुख पाच कात्रणे, गोशाळेचे अलीकडील 1-2 फोटो, घोषणा, या फॉर्मसह महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीसाठी केलेल्या एक हजार रुपयाच्यानोंदणी शुल्काच्या व्यवहाराच्या तपशीलाचा पुरावा इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील सर्व गोशाळा, पांजरपोळ, गोक्षेत्र यांची नोंदणी करण्याबाबतचे आदेश शासन स्तरावरुन देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये पशुचे संवर्धन, संरक्षण व कल्याण करण्यासाठी शासनाने अधिसुचनेनुसार महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग - 2023 च्या कायद्यानुसार राज्यातील सर्व गोशाळा, पांजरपोळ, गोक्षेत्र यांची नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे. जरी त्या कोणत्याही संस्थेकडे नोंदणीकृत असल्या अथवा नसल्या तरी महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणी करणे आवश्यक असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त श्री. नेमाडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.....

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या