🌟परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची अशीही कर्तव्यतत्परता पुर्णेतील कोल्हापुरी बंधाऱ्याची केली प्रत्यक्ष पाहणी...!


🌟पुर्णेतील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता🌟 

पुर्णा (दि.०१ डिसेंबर) - परभणी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सन्माननीय रघुनाथ गावडे यांनी पुर्णेतील पाण्याचा गंभीर प्रश्न कायमस्वरूपी कसा सोडवता येईल या दृष्टीने कर्तव्यतत्परता दाखवत मागील अनेक वर्षांपासून डोअर दुरुस्ती अभावी पाणीसाठी रोखण्यात संपूर्णतः निष्काम ठरत असलेल्या पुर्णा नदीपात्रावरील कोल्हापुरी बंधाऱ्याची दि.२९ नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.


यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी तथा पुर्णा नगर परिषदेचे प्रशासक जिवराज दापकर, तहसिलदार माधवराव बोथीकर,नगर परिषद मुख्यधिकारी युवराज पौळ, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत उर्फ बाळू कदम,भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विश्वनाथ होळकर आदींची उपस्थिती होती पुर्णा शहरात मागील महिन्याभरापासून तिव्र पाणीटंचाई जाणवत होती त्या पाणीटंचाई प्रश्न सोडवावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गोविंद उर्फ राज ठाकर यांनी जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांना निवेदन दिले होते. 

पुर्णा शहरातील तिव्र पाणीटंचाईच्या परिस्थितीची गांभिर्याने दखल घेऊन जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पुर्णेत दाखल होताच कोल्हापुरी बांधाऱ्याची पाहणी करण्यासाठी पोहोचले त्यांनी पुर्णा नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्यासह पुर्णा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला देखील भेट दिली त्यांच्या या कर्तव्यतत्परतेचे सर्वस्तरातून कौतुक केले जात असून सन्माननीय जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी कठोर उपाययोजना करुन पुर्णेचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवतील अशी अपेक्षा जनसामान्यांतून व्यक्त केली जात आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या