🌟पुर्णेतील स्वातंत्र्य सैनिक सुर्यभानजी पवार महाविद्यालयात नवमतदार नोंदणी व मतदार जागृती कार्यशाळा संपन्न...!


🌟या कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार हे होते🌟

पुर्णा (दि.२८ नोव्हेंबर) - येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नवमतदार जागृती व मतदार नोंदणी अभियानांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने कार्यशाळा संपन्न झाली. 

या कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार हे होते या कार्यशाळेच्या प्रस्ताविकात संयोजक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर पी डी सूर्यवंशी यांनी मतदान व मतदार नोंदणी प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली तसेच आठरा वर्षे पूर्ण केलेल्या सर्व नवमतदारांनी मतदार म्हणून आपली नावे मतदार यादीत नोंदणी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

 तर अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांनी मतदान प्रक्रिया आणि नवमतदार यांची जबाबदारी व कर्तव्य याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले याप्रसंगी विचार मंचावर महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक डॉ. भीमराव मानकरे आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. विजय भोपाळे हे उपस्थित होते. 

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. दिपमाला पाटोदे यांनी केले. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या